Share

“ड्रग्ज बिझनेसमध्ये आदित्य ठाकरे, Uddhav Thackeray आरोपी,” वकील निलेश ओझा यांचा गंभीर आरोप

It will be important to see how Uddhav Thackeray and Aditya Thackeray respond to the allegations made by lawyer Nilesh Ojha.

by MHD

Published On: 

Nilesh Ojha criticize Aditya Thackeray and Uddhav Thackeray in Disha Salian death case

🕒 1 min read

Uddhav Thackeray । पाच वर्षानंतर पुन्हा एकदा दिशा सालियन मृत्यू प्रकरण (Disha Salian death case) चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. काही दिवसांपूर्वी दिशा सालियनचे वडील सतीश सालियन (Satish Salian) यांनी याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका देखील दाखल केली आहे.

त्यांनी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अशातच आज सतीश सालियन आणि त्यांचे वकील निलेश ओझा (Nilesh Ojha) यांनी मुंबईचे गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त लखमी गौतम यांची भेट घेतली आहे.

त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. अशातच आता याप्रकरणी निलेश ओझा यांनी माध्यमांशी संवाद साधला, यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

“आदित्य ठाकरे हे ड्रग्स बिझनेसमध्ये सहभागी असल्याचे नार्कोटेक्स ब्युरोच्या तपासात हे आढळून आले आहे. याबाबत इतंभू माहिती आम्ही या अर्जात दिली असून आदित्य ठाकरे, डिनो मोरिया यांच्या फोन कॉल्ससह समीर खान नावाच्या व्यक्तीची डीएफीपी नावाची कंपनी होती, जी ड्रग्सचे सिंडिकेट चालवत होती,”असा दावा निलेश ओझा यांनी केला.

Nilesh Ojha target Aditya Thackeray and Uddhav Thackeray

“आमच्या तक्रारीमध्ये ठाकरे पिता-पुत्र आरोपी आहेत. पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी याप्रकरणी आदित्य ठाकरे यांना पहिल्यापासून वाचवण्याचा प्रयत्न केला,” असा गंभीर आरोप निलेश ओझा यांनी केला आहे. यावर आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे काय प्रत्युत्तर देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही