Share

“…तर अमित शाह ठाकरे गटात प्रवेश करतील,” Sanjay Raut यांचा अजब दावा

Sanjay Raut statement has again created a conflict between the BJP and the Thackeray group in the state. Raut statement may heat up the political atmosphere.

by MHD

Published On: 

Amit Shah will join Thackeray group said Sanjay Raut

Sanjay Raut । ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे सातत्याने महायुती सरकार आणि विशेषतः भाजपवर (BJP) टीका करत असतात. यामुळे अनेकदा राज्याचे राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळते. अशातच आता संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर निशाणा साधला आहे.

“शिंदे गटाचे कसले ऑपरेशन टायगर आहे? त्यांची आज सत्ता आहे म्हणून ऑपरेशन टायगर (Operation Tiger). जर उद्या सत्ता नसतील तर यांचे संपूर्ण दुकान खाली होईल. फक्त दोन तास आमच्या हातात ईडी (ED) आणि सीबीआय (CBI) द्या, अमित शाह देखील आमच्या पक्षात प्रवेश करतील,” असा दावा राऊत यांनी केला आहे. (Sanjay Raut on Amit Shah)

“ईडी हातात आली की बावनकुळ्यांपासून सर्व तुम्हाला कलानगरच्या दारात पाहायला मिळतील. तुम्ही आम्हाला सत्तेची मस्ती दाखवू नका. सत्ता आम्हीही भोगली आहे. पण इतक्या विकृत पद्धतीने सूडबुद्धीने आम्ही कधी सत्ता राबवली नाही,” असा आरोपही संजय राऊत यांनी यावेळी केला.

पुढे ते म्हणाले की, “दिल्लीतील मृतांचा सरकारी आकडा 30 आहे. माझ्या माहिती प्रमाणे किमान 120 ते 150 लोक चेंगराचेंगरीत मरण पावले आहेत. सरकार मृतांचा आकडा लपवत आहे. महाकुंभला जाण्यासाठी भाजपकडून भ्रमित केले जात आहे,” असा दावा राऊत यांनी केला.

Sanjay Raut targeting Amit Shah

संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे राज्यात पुन्हा भाजप विरुद्ध ठाकरे गट असा संघर्ष निर्माण झाला आहे. राऊतांच्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापू शकते. यावर भाजप आता संजय राऊत यांना कशाप्रकारे प्रत्युत्तर देते? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही