Share

बापू आंधळे हत्याप्रकरणी मोठी बातमी! फरार Baban Gitte ची संपत्ती जप्त होणार?

Baban Gitte name has come to the fore in the Bapu Andhale murder case. But now the problems of Baban Gitte, who is absconding, have increased.

by MHD

Published On: 

Baban Gitte property to be confiscated in Bapu Andhale murder case

Baban Gitte । मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे (Santosh Deshmukh murder case) संपूर्ण राज्य ढवळून निघाले आहे. या प्रकरणी दररोज नवीन खुलासे होत आहे. बीडमध्ये हत्येची ही पहिलीच घटना नाही. 29 जून 2024 रोजी बीडच्या परळीत सरपंच बापू आंधळे (Bapu Andhale) यांची हत्या करण्यात आली होती.

या प्रकरणात बबन गित्ते याचे नाव समोर आले आहे. महत्त्वाचे म्हणजे तो अजूनही पोलिसांना सापडला नाही. परंतु, आता फरार असलेल्या बबन गित्ते याच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण पोलिसांकडून त्याच्या संपत्तीची माहिती जमा करण्यात आली आहे.

पोलीस येत्या दोन दिवसात न्यायालयाकडे संपत्ती जप्तीसाठी परवानगी मागणार आहे. त्यामुळे बबन गित्ते याच्या संपत्तीवर (Baban Gitte property) टाच येणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे आता तरी बबन गित्ते पोलिसांना शरण येणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.

दरम्यान, बापू आंधळे हत्या प्रकरणात पोलिसांनी तपास पूर्ण केला आहे. पोलिसांनी दोषारोपपत्र अंबाजोगाई न्यायालयात दाखल केले आहे. या प्रकरणात दोन्ही गटांकडून परस्पर विरोधी तक्रारी देण्यात आल्या होत्या. परंतु, यामध्ये वाल्मिक कराडच्या (Walmik Karad) विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न आणि कट रचल्याप्रकरणी गुन्हा नोंद आहे.

Baban Gitte property to be confiscated

असे असूनही परळी पोलिसांनी तपासात वाल्मिक कराडचा सहभाग नाही, असे सांगत त्याचे नाव आरोपीच्या यादीतून वगळण्यात आले आहे. या हत्याप्रकरणात फक्त बबन गित्ते फरार असून त्याच्या आता संपत्तीवर टाच येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही