Share

“धनंजय मुंडेंवर मकोका लावणार का? त्यांचा राजीनामा घेऊन…” अंजली दमानियांनी दिले Ajit Pawar यांना मोठे आव्हान

Anjali Damania challenge to Ajit Pawar has created a lot of excitement in the political circles. What is Ajit Pawar answer to Damania now? Everyone is paying attention to this.

by MHD

Published On: 

Anjali Damania challenged Ajit Pawar over Dhananjay Munde resignation

Ajit Pawar । संतोष देशमुख हत्याप्रकरणी (Santosh Deshmukh murder case) सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) या सतत मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत त्यांनी मुंडेंविरोधात पुरावे देखील दिले आहेत. अशातच आता त्यांनी अजित पवारांना खुलं आव्हान दिले आहे.

“अजित पवार आज बीड दौऱ्यावेळी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना म्हणाले की, याच्यापुढे जर कोणी खंडणी मागितली तर मी मकोका लावायला मागेपुढे पाहणार नाही. पण ज्यावेळी अवादा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना खंडणी मागितली गेली, त्यांना शासकीय बंगल्यावर बोलवलं होतं. या कंपनीचे कर्मचारी तुमच्या शासकीय बंगल्यामध्ये, धनंजय मुंडे यांच्या शासकीय बंगल्यामध्ये जर आढळले तर त्यांच्यावर तुम्ही मोक्का लावणार का? तुमच्या धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्याने खंडणी मागितली आहे. तर आता तुम्ही धनंजय मुंडे यांच्यावर मकोका का लावत नाही? असा सवाल दमानिया यांनी अजित पवारांना केला आहे.

पुढे त्या म्हणाल्या की, “अजित पवार यांना मी पुरावे दिले आहेत.पण त्यांनी अजून कारवाई केली नाही. त्यामुळे आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन खरे पालकमंत्री तुम्ही आहात हे दाखवून द्या,” असे आव्हान देखील दमानिया यांनी दिले आहे.

Anjali Damania on Dhananjay Munde

दरम्यान, अंजली दमानिया यांनी अजित पवारांना दिलेल्या आव्हानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अजित पवार हे आता दमानिया यांना काय उत्तर देणार? ते मुंडेंचा राजीनामा घेणार का? अशा चर्चांना उधाण आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही