Share

IPL 2025 । केएल राहुल नव्हे, तर ‘हा’ खेळाडू सांभाळणार Delhi Capitals च्या कर्णधारपदाची धुरा!

Ahead of IPL 2025 now comes an important update regarding Delhi Capitals. There is a possibility of changing the captain of the team.

by MHD

Published On: 

Axar Patel become captain of Delhi Capitals in IPL 2025

🕒 1 min read

IPL 2025 । अवघ्या काही महिन्यांच्या अंतरावर येऊन ठेपलेल्या IPL कडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. यंदा IPL चे विजेतेपद कोणता संघ जिंकेल याबाबतची उत्सुकता त्यांना आतापासूनच लागली आहे. अशातच आता Delhi Capitals बाबत एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे.

दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) त्यांच्या नवीन कॅप्टनच्या (Delhi Capitals captain) शोधात असून फ्रँचायझीकडून अजूनही कॅप्टन्सीच्या नावाची घोषणा करण्यात आली नाही. दरम्यान, लिलावात दिल्लीने 14 कोटींमध्ये केएल राहुल (KL Rahul) वर बोली लावली होती. त्यामुळे तो कॅप्टन होईल, अशीच चर्चा सुरू होती.

पण आता अक्षर पटेल (Axar Patel) हा दिल्लीचा कॅप्टन होऊ शकतो, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. दरम्यान, अक्षर पटेल हाच Delhi Capitals चा कर्णधार असा होईल की केएल राहुल याला संघात विकेटकीपर फलंदाज म्हणून कायम ठेवले जाईल, हे लवकरच समजेल. तसेच मागील हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार असणाऱ्या फाफ डू प्लेसिस (Faf du Plessis) ला इलेव्हनमध्ये स्थान मिळते का ते पहावे लागेल.

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे दिल्ली कॅपिटल्सकडे सध्या कॅप्टन म्हणून केएल राहुल, फाफ डुप्लेसिस आणि अक्षर पटेल असे तीन पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे आता कोणत्या खेळाडूच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ पडते? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही