Share

“न्याय देणारी व्यवस्थाच आरोपीला वाचवण्याची भूमिकेत असेल तर…”; Rohit Pawar यांचा सरकारवर गंभीर आरोप

Dhananjay Deshmukh has taken a stand that he will protest till my family gets justice. Due to this, Rohit Pawar has now targeted the state government.

by MHD

Published On: 

Rohit Pawar on Devendra fadanvis and Ajit Pawar

Rohit Pawar । संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्येप्रकरणी त्यांचे बंधू धनंजय देशमुख हे स्वत: पाण्याच्या टाकीवर चढले होते. जोपर्यंत माझ्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी आंदोलन करणार, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. यावरून आता राज्य सरकारवर विरोधकांनी निशाणा साधला आहे.

शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी एक्सवर राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. “मस्साजोगचे मयत सरपंच संतोष देशमुख कुटुंबावर आंदोलन करण्याची वेळ येणे हे खूप दुर्दैवी आहे. न्याय देणारी व्यवस्थाच आरोपीला वाचवण्याची भूमिका घेत असेल तर देशमुख कुटुंबाकडे आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय काय आहे?,” असा संतप्त सवाल रोहित पवार यांनी केला आहे.

“राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी आता गुळगुळीत, मिळमिळीत भूमिका घेण्यापेक्षा कठोर भूमिका घ्यावी. या घटनेत दोषींना शिक्षा देण्यात सरकार अपूर्ण पडले तर इतिहास तुम्हाला कधी माफ तर करणारच नाही. गुन्हेगारापेक्षा अधिकचा दोष गुन्हेगारांना वाचवल्यामुळे तुमच्या माथी लागेल हे देखील लक्षात ठेवा,” असा आरोपही त्यांनी केला आहे.

Rohit Pawar on Santosh Deshmukh murder

पुढे ते म्हणाले, “राज्यभरातील नागरिकांच्या भावना तीव्र असताना, आरोपी कोण, सूत्रधार कोण, तपास कसा होतोय हे सर्वांना माहित असतानाही सरकार केवळ राजकीय तडजोडीसाठी भूमिका घेत नसेल तर याहून मोठं दुर्दैव काय असू शकतं?”, अशीही प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही