Share

ठाकरे गट सत्तेत सहभागी होणार? Aditya Thackeray यांनी सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्र्याची भेट घेतल्याने खळबळ

Thackeray Group MLA Aditya Thackeray has met the Chief Minister for the third time in a row. Today again Aditya Thackeray had entered the Ministry to meet the Chief Minister.

by MHD

Published On: 

ठाकरे गट सत्तेत सहभागी होणार? Aditya Thackeray यांनी सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्र्याची भेट घेतल्याने खळबळ

Aditya Thackeray । मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. अशातच आता ठाकरे गट (Thackeray group) सत्तेत सहभागी होणार का? अशा चर्चांना उधाण आले आहे. याला कारणही अगदी तसंच आहे. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्र्यांची (Devendra Fadanvis) भेट घेतली आहे.

तसेच काही दिवसापूर्वी दैनिक सामनातून मुख्यमंत्रांचं कौतुक केलं होतं. “देवा भाऊ अभिनंदन!” या शीर्षकाखाली देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचं कौतुक केले होते. गडचिरोलीला पोलाद शहर करण्याचा केलेला निर्धार आणि नक्षलवाद्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर केलेलं आत्मसमर्पण, या सगळ्याचं कौतुक लेखातून करण्यात आलं होतं. त्यावेळी ठाकरेंच्या भूमिकेबद्दल चर्चांना उधाण आले होते.

अशातच आज पुन्हा आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मंत्रालयात दाखल झाले होते. पण या भेटीदरम्यान वरळीत राहणाऱ्या पोलीस पत्नी आणि गृहनिर्माणबाबत फडणवीसांसोबत चर्चा झाली असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. तसेच मुंबई पोलिसांची निवासस्थानाच्या डागडुजीचा प्रश्नावर देखील चर्चा झाली असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.

Aditya Thackeray meet Devendra Fadanvis

यावरून आता ठाकरे गट महायुतीसोबत सत्तेत जाणार का? अशा चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. दरम्यान, होऊ घातलेल्या मुंबई महापालिका निवडणूका ठाकरे गट स्वबळावर लढू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही