Chhagan Bhujbal । नुकतंच राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटपानंतर महायुतीमधील काही नेत्यांना मंत्रिपदाची संधी न मिळाल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा आहे. मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळ देखील नाराज असल्याचं पाहायला मिळालं.
अशातच राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना पुन्हा डिवचलं आहे. राष्ट्रवादीने छगन भुजबळांचे खूप लाड केले आहेत. त्यांचे अजून किती लाड करायचे?, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.
तसेच जो जे वांच्छिल ते तो लाभो. त्यांना कुठे जायचे तिकडे जाऊद्यात, असे देखील माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी म्हटले. माणिकराव कोकाटे यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे आता छगन भुजबळ राष्ट्रवादी अजित पवार गटातच राहणार की? वेगळा काही निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- धनंजय मुंडेंवर Manoj Jarange पुन्हा कडाडले, म्हणाले; “शहाणा हो नाहीतर….”
- “धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या सूचनेवरूनच…” Sanjay Raut यांचा खळबळजनक दावा
- ‘त्या’ वक्तव्यावर Amol Mitkari भडकले; म्हणाले , “Suresh Dhas बेभान सुटलेला बैल…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now📈 लोकप्रिय बातम्या
Ask Maharashtra Desha
तुमच्या प्रश्नाचे उत्तर आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास Web Search fallback वापरला जाऊ शकतो.












