Share

Maharashtra Politics । ठाकरे-पवार कुटुंब एकत्र येणार? अजित पवार गटाच्या बड्या नेत्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Maharashtra Politics, Many political parties have expressed their wish that these families should be reunited. Similarly, now the big leader of Ajit Pawar group has also made a statement that the Thackeray-Pawar family should unite.

by MHD

Published On: 

Maharashtra Politics । ठाकरे-पवार कुटुंब एकत्र येणार? अजित पवार गटाच्या बड्या नेत्याच्या 'त्या' वक्तव्याने चर्चांना उधाण

🕒 1 min read

Maharashtra Politics । ठाकरे आणि पवार कुटुंबात फूट पडून हे दोन्ही कुटुंबे एकमेकांविरोधात आरोप करताना दिसत आहेत. यामुळे अनेकदा राज्याचे राजकीय वातावरण तापत असल्याचेही आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक राजकीय मंडळींनी या कुटुंबांनी एकत्र यावे, अशी इच्छा बोलून दाखवली आहे. अशातच आता अजित पवार गटाच्या बड्या नेत्याने देखील ठाकरे-पवार कुटुंबाने एकत्र यावं, असे वक्तव्य केले आहे.

अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ म्हणाले की, “ठाकरे आणि पवार कुटुंबाने एकत्र यावं. माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. जर ही दोन्ही कुटुंबे एकत्र आली तर आम्हाला खूप आनंद होईल.” त्यांचे हे विधान सध्या चांगलेच चर्चेत येत आहे. यावर आता ठाकरे आणि पवार कुटुंब काय प्रत्युत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

दरम्यान, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार (Ashatai Pawar) यांनी विठुरायाचे दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊ दे, असं साकडं विठुरायाकडे घातल्याचं आशाताई पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. अशातच आता छगन भुजबळ यांनीही ठाकरे आणि पवार कुटुंबाने एकत्र यावं, असे वक्तव्य केल्याने याची राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागली आहे.

Chhagan Bhujbal Statement

दरम्यान, छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने ते नाराज आहेत. अनेकदा त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली आहे. आपली नाराजी दूर करण्यासाठी कोणाचाही फोन आला नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी माध्यमांशी बोलताना दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!