अजित पवार गटाच्या नेत्याने थोपटले देवेंद्र फडणवीसांविरोधात दंड; म्हणाले, ‘माझ्या नादी लागू नका’

Nawab Malik vs Devendra Fadnavis । अजित पवार नेते नवाब मलिक देवेंद्र फडणवीसांविरोधात दंड थोपटले  आहे. फडणवीसांच्या विरोधात कोर्टात जाण्याचा इशारा त्यांनी दिल्याने महायुतीत वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कुणी कितीही मोठं असू द्या किंवा छोटी असू द्या. देवेंद्र पण असू द्या मी सगळ्यांच्या विरोधात कोर्टात जाणार आहे. जर या लोकांनी माफी मागितली नाही … Read more

Published On: 

Nawab Malik on Devendra Fadnavis Vidhansaha Election 2024

Nawab Malik vs Devendra Fadnavis । अजित पवार नेते नवाब मलिक देवेंद्र फडणवीसांविरोधात दंड थोपटले  आहे. फडणवीसांच्या विरोधात कोर्टात जाण्याचा इशारा त्यांनी दिल्याने महायुतीत वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कुणी कितीही मोठं असू द्या किंवा छोटी असू द्या. देवेंद्र पण असू द्या मी सगळ्यांच्या विरोधात कोर्टात जाणार आहे. जर या लोकांनी माफी मागितली नाही तर मी यांच्या विरोधात कोर्टात जाणार आहे. सिव्हिल आणि डिफेन्सेस केस टाकणार असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, ‘फडणवीस यांचा पाठिंबा नबाब मलिक मागतोय का? आम्ही मागत नाही, आम्ही मागणारही नाही. मागणारा नवाब नाही, आम्ही देणारे आहोत. नबाब मलिक कोणाला घाबरत नाही.

माझ्या बाबतीत गैरसमज निर्माण करतात, दाऊदशी माझं नाव जोडतात. काही लोक आतंकवादी बोलतोय काही लोक देशद्रोही बोलतायेत. या सगळ्यांना नोटीस पाठवणार, सगळ्यांवर क्रिमिनल केस टाकणार आहे, असं नवाब मलिक म्हणाले.

भाजपवाल्यांनो, ताकात लावून बघा… तुमची हिंमत असेल तर माझी जागा पाडून दाखवा. मी फटिचर माणूस आहे. कोणीही माझ्या नादी लागू नका, असा इशारा मलिकांनी दिला आहे.

Nawab Malik on Devendra Fadnavis Vidhansaha Election 2024

महत्वाच्या बातम्या

 

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही