Share

मराठा आरक्षणावरून हायकोर्टाने गुणरत्न सदावर्तेंना फटकारले; सदावर्तेंची बिग बॉसमधून एक्झिट?

🕒 1 min readमुंबई ।  मराठा आरक्षणाचा ( Maratha Reservation ) महत्त्वाची सुनावणी सुरु असताना Gunaratna Sadavarte यांनी बिग बॉसमध्ये एन्ट्री घेतली. त्यावरुन हायकोर्टाने त्यांना चांगलच फटकारले आहे. दरम्यान, आता गुणरत्न सदावर्ते यांची बिग बॉसच्या घरातून एक्झिट झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे. सोशल मीडियावर गुणरत्न सदावर्ते यांची एक्झिट झाली असल्याच्या चर्चा आहेत. मराठा आरक्षणाच्या … Read more

Published On: 

🕒 1 min read

मुंबई ।  मराठा आरक्षणाचा ( Maratha Reservation ) महत्त्वाची सुनावणी सुरु असताना Gunaratna Sadavarte यांनी बिग बॉसमध्ये एन्ट्री घेतली. त्यावरुन हायकोर्टाने त्यांना चांगलच फटकारले आहे. दरम्यान, आता गुणरत्न सदावर्ते यांची बिग बॉसच्या घरातून एक्झिट झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे.

सोशल मीडियावर गुणरत्न सदावर्ते यांची एक्झिट झाली असल्याच्या चर्चा आहेत. मराठा आरक्षणाच्या सुनावणीसाठी सदावर्ते बिग बॉसच्या घराबाहेर पडले असल्याचं सांगण्यात येत आहे. पण सदावर्ते नेमकं कोणत्या कारणासाठी घराबाहेर पडले आहेत, हे कारण अद्यापही समोर आलेलं नाहीये.

मराठा आरक्षणाची इतकी महत्त्वपूर्ण सुनावणी सुरू असताना सदावर्ते बिग बॉसमध्ये जाऊन बसलेत”, अशी माहिती इतर वकिलांकडून हायकोर्टाला देण्यात आली होती.

याचिकाकर्त्यांना प्रकरणाचं गांभीर्यचं नाही का? असा सवाल उपस्थित करत आपली याचिका सर्वात आधी घ्या म्हणून सदावर्ते आमच्यापुढे विनंती करत होते असं हायकोर्टाने म्हटलं आहे. आता युक्तिवाद करण्याची वेळ आली तर तेच गायब झाले? असाही सवाल हायकोर्टाने केलाय.

मराठा आरक्षणाला विरोध करणा-या सर्व याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद संपला, आता कुणालाही युक्तिवाद करण्याची संधी मिळणार नाही, असं हायकोर्टाने म्हटलं आहे. पुढील सुनावणीत राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता डॉ. बीरेंद्र सराफ युक्तिवाद करणार आहे. मराठा आरक्षणासंदर्भातील प्रकरणाची हायकोर्टातील पूर्णपीठापुढील सुनावणी 19 नोव्हेंबरपर्यंत तहकूब करण्यात आलीये.

मराठा आरक्षणाच्या सुनावणी झाल्यास गुणरत्न सदावर्ते हे पुन्हा बिग बॉसच्या घरात येऊ शकतात.

Gunaratna Sadavarte VS Maratha reservation Manoj Jarange

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!