Share

अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात Eknath Shinde यांना दाखवले काळे झेंडे

Eknath Shinde abdul sattar

Published On: 

🕒 1 min read

छत्रपती संभाजीनगर- पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी शुक्रवारी सिल्लोड येथे आयोजित केलेल्या लाडकी बहीण योजना लाभार्थी कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झाले. मात्र, शहरातून काढण्यात आलेल्या भव्य रॅलीदरम्यान तेथील पठाण परिवार व सर्वे नंबर ९२ मधील प्लॉटधारकांनी त्यांच्या मालमत्ता बळकावल्याचा आरोप करून मुख्यमंत्र्यांना काळे बॅनर व काळे रुमाल दाखवत त्यांचा निषेध व्यक्त केला.

पठाण परिवारांनी दोन दिवसांपुर्वीच सर्वे नंबर ३७७ मधील त्यांची वडीलोपार्जित जमीन मंत्री अब्दुल सत्तार यांनी बळजबरी ताबा टाकून बळकवली आहे. आणि तिथे मोठमोठे शेड टाकून अतिक्रमण केले असल्याची तक्रार त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तसेच निवेदन देऊन सिल्लोड येथे उपस्थित राहू नये, हा नगर विकास मंत्री पदाचा अपमान आहे. असे म्हटले आहे. सर्वे नंबर ९२ मध्ये काही लोकांच्या प्लॉटवर अब्दुल सत्तार यांनी बळजबरी कब्जा करून तिथे हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजचे भव्य निर्माण सुरू केले आहे. त्यामुळे सर्वे नंबर ९२ मधील मालमत्ता धारक यांनी सुद्धा तिव्र निषेध व्यक्त केला.

सिल्लोड तालुक्यातील माजी आमदार सांडू पाटील लोखंडे यांनी त्यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर नगरपरिषदमार्फत बेकायदेशीर भिंत टाकून रस्ता बंद केला म्हणून त्यांनी काळे बॅनर व काळे झेंडे फडकावून मुख्यमंत्री व पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचा तीव्र निषेध व्यक्त केला.

आशाबाई धोंडू बोराडे यांनी त्यांची उंडणगावची सर्वे नंबर 336 मधील जमिनीवर अब्दुल सत्तार यांच्या शैक्षणिक संस्थेद्वारा बळजबरी ताबा टाकून तिथे भव्य कॉलेजचे निर्माण केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मी तुमची लाडकी बहीण तुमच्या लाडकी बहिणीला न्याय द्या. अशा घोषणा देत त्यांनी सुद्धा काळे बॅनर व झेंडे दाखवून, मुख्यमंत्र्यांचा निषेध केला.

जेव्हा मुख्यमंत्री शिंदे शिवसेना भवन कार्यालयासमोर आले तेव्हा आंदोलनकर्त्यांनी कार्यालयाच्या समोरील एका इमारतीवर उभे राहून बॅनर झळकवले. त्यावेळेस मुख्यमंत्र्यांसोबत असलेला प्रचंड जमाव तिथेच थबकला, तिथे जमलेल्या प्रचंड मोठ्या जमाव कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरू झाली व थोडा वेळ वातावरण तणावग्रस्त झाले होते. सदर आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी इमारतीवर जाऊन गच्चीवरील बंद असलेला दरवाजा तोडला व आंदोलन कर्त्यांना अटक केली.

अटक झालेल्यांची नावे पुढील प्रमाणे भाजपाचे माजी आमदार सांडू पाटील लोखंडे, सुनील पाटील मिरकर, सुरेश पाटील बनकर, मनोज गंगाराम मोरेल्लु, विष्णू गंगाराम काटकर, महेश शंकरलाल शंकरपेल्ली,वृषाली सुनील मिरकर, आशाबाई धोंडू बोराडे, रूपाली मनोज मोरे यांना अटक करून फर्दापुर पोलीस स्टेशन येथे स्थानबद्ध करण्यात आले. सदरील दोन्ही आंदोलनाची संपूर्ण तालुक्यात जोरदार चर्चा आहे व सर्व सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!