राजेभाऊ मोगल, जालना : महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांची बुधवारी (ता.८) जाहीर सभा होत आहे. मराठा आंदोलनाची धग अद्याप कमी झालेली नसल्याने अमित शहांनी याचा धसका घेतला असल्याचे बघायला मिळत असून या सभेला पाणी बॉटल नेण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील प्रमुख उपस्थिती असणार आहे. सभेच्या आधी कडक असा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, या सभेला येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी केली जातेय. सभेला पाणी बॉटल नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. यामुळे अनेकजण सभेस्थळी जाण्यास नकार देत आहेत. या सर्व प्रकाराचा श्री. दानवे यांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- पाच वर्षापूर्वी ज्यांना आपण संसदेत पाठविले त्यांनी काय दिवे लावले? : नीलेश लंके
- मावळच्या विकासात खासदार बारणे यांचा सिंहाचा वाटा – नितीन गडकरी
- भांबावलेल्या आढळरावांनी घेतली रामलिंगाची खोटी शपथ!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











