पुणे : हिंजवडी IT Park परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे शनिवारी शिक्कामोर्तब झाले. एका शेतात बिबट्याच्या नवजात बछड्याला वन विभाग आणि ‘अॅनिमल रेस्क्यू टीम’ने ताब्यात घेतले आहे. हिंजवडी परिसरात ऊसतोडणी सुरू आहे. यावेळी बिबट्या आढळण्याचे समोर आले आहेत.
नेरे (ता. मुळशी) येथील उसाच्या फडात शनिवारी नर जातीचा बछडा आढळून आला. राहुल जाधव यांच्या शेतात ऊसतोड मजुराला हा बछडा आढळला. जाधव यांनी वन विभागाला ही माहिती दिली. वन विभागाने बछड्याला ताब्यात घेतले. मात्र, त्याला मातेची गरज असल्याने तो ज्या ठिकाणी सापडला त्याच ठिकाणी सोडले आणि कॅमेरे लावून निरीक्षणे नोंदविली जाणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
- मोदींची जुमलेबाजी व फेकुगिरी आता चालणार नाही; फडणवीसांनी मुन्नाभाई MBBS चित्रपट पहावा
- Explained । भूमिका बदलणाऱ्या विजय शिवतारेंचा अजित पवारांना किती फायदा होईल?
- Maratha Reservation । …यांनाच मतदान करा, बाकीचे पाडून टाका; मनोज जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.







