Explained । भूमिका बदलणाऱ्या विजय शिवतारेंचा अजित पवारांना किती फायदा होईल?

Explained Vijay Shivtar benefit Ajit Pawar?

Ajit Pawar । लोकसभा निवडणूका जश्या-जश्या जवळ येत आहेत तसे राजकीय नेते कुलांट्या उड्या मारताना आपल्याला दिसत आहे. पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी अजित पवारांना टोकाचा विरोध केला होता, गरज पडली तर शिवसेना नेतेपदाचा राजीनामा देईल पण पवारांना निवडून येऊ देणार नाही असे शिवतारे म्हणाले होते.

बारामती कोणाचा सातबारा नाही, असे सांगत विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती. अजित पवारांचा माज गेलेला नाही, अजित पवार नीच, उर्मट म्हणत खालच्या भाषेत शिवतारे यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली होती.

त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि शिवतारे यांची मुंबईत बैठक झाली. त्यात त्यांना पुरंदरच्या विकासासाठी निधी देण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे बोलले जात आहे. बारामती लोकसभा निवडणूक लढविण्याची घोषणा करून अजित पवार यांच्याविरोधात दंड थोपटणारे पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे अजित पवारांनी विजय शिवतारेंना त्यांचा आवाका दाखवला असल्याची चर्चा सद्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

अजित पवारांमधला उर्मटपणा गेला नाही, जनतेलाही ते आवडत नाहीत. त्यामुळे शप्पत घेऊन सांगतो बारामतीतून अजित पवार जिंकू शकत नाही.  माझी लायकी काय आणि अवाका किती हे अजित पवारांना दाखवणारच असे म्हणणारे विजय शिवतारे (Vijay Shivtare) बारामती लोकसभा निवडणुकीतून माघार घेताना दिसत आहे. त्यामुळे कोणाचा आवाका किती आहे हे सर्व सामान्य जनतेला आता कळले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर शिवतारे यांचा सूर बदलला आहे, त्यांनी जाहीरपणे राष्ट्रवादीला म्हणजेच अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना मतदान करा, असे आवाहन पुरंदरकरांना केले आहे.

जनतेचे मत म्हणत गवगवा करणारे शिवतारे आता जनतेच्या मताला विचारत घेतले नसल्याचे पुरंदरकर म्हणत आहे. शिवतारेंची दुटप्पी भूमिका सामान्य जनतेला आवडली नसल्याचे तेथील नागरिक म्हणत आहेत. त्यामुळे यातून अजित पवारांना फायदा होणार नाही, याउलट शिवतारेंनी केलेल्या विधानामुळे आणि बदलेल्या भूमिकेमुळे पवारांना मोठा फटका यातून बसेल अशी चर्चा आहे.

शिवतारेंनी केलेले बंड आता जनता स्वीकारल्याशिवाय राहणार नाही. जनतेचे हे मत आहे असे ठासून सांगणारे आता नरमले असले तरी  भूमिका बदलणारे नेते हे पुरंदरकरांना आणि महाराष्ट्रातील जनतेला आवडलेले नाही. याचा अजित पवारांना मोठ्या प्रमाणात तोटाच होणार आहे.

माजी आमदार विजय शिवतारे यांना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पुरंदरकरांनी नाकारले होते, यावेळी हि बदलेल्या भूमिकेमुळे जनता त्यांना स्वीकारेल का? हे पाहणे महत्वाचे ठरेल.

Explained Vijay Shivtar benefit Ajit Pawar?

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.