Share

Maratha Reservation । …यांनाच मतदान करा, बाकीचे पाडून टाका; मनोज जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन

Maratha Reservation | मराठा आरक्षणाच्या दृष्टीने जो उमेदवार मराठ्यांना मदत करेल, त्यालाच मतदान करा. बाकी राजकारण्यांचा करेक्ट कार्यक्रम करण्याचे आवाहन मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला केले आहे.

जो आपल्या बाजूने उभा राहील त्याला मतदान करा, बाकीचे पाडून टाका. तुमच्या आमच्या हट्टापायी जात संपवायची नाही. भावनेचा आहारी जाऊन निवडणुका होत नाहीत. यांना धसकी होती म्हणून यांनी उमेदवार दिला नाही. उद्यापासून बघा कशा उमेदवारी देतात, आपल्या जातीमुळे हे फुल गॅसवर होते. शिक्का असा हनायचा, ते म्हणाले पाहिजे मराठ्यांच्या नादी लागायचे नाही. कोणालाही मतदान करा, पण तो सग्या सोयऱ्याच्या बाजूने असला पाहिजे. मी कोणालाही मतदान करणार नसल्याचं मनोज जरांगे म्हणाले.

ज्या काही चार ते पाच मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार त्यालाच मराठ्यांनी मतदान करा. कार्यक्रम मात्र शंभरटक्के लावायचा कधीच न पडणारा पाडायचा, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

लोकांना आधी उमेदवार द्यावा लागतो मात्र आपलं उलटं आहे, आपल्याकडे आधी मत आहेत. मराठा आता हारून देऊ चालणार नाही. या राजकारणाच्या नावाखाली माझी जात राहता कामा नये. तिला मी मातीत मिसळू शकत नाहीत. मराठा समाजाने त्यांचा निर्णय घ्यायचाय. कोणालाही पाठिंबा नाही, लोकसभेमध्ये ज्यांना पाडायचं त्यांना पाडा असं जरांगे यांनी सांगितलं.

आता मराठे मोकळे राहिले, ते आता टेन्शमध्ये आले असतील. नेमका कोणत्या उमेदवाराला मराठे पाडणार त्यांना समजणार नाही. राजकारणामुळे मला जातीचं वाटोळं करायचं नसल्याचं जरांगेंनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या

Maratha Reservation | मराठा आरक्षणाच्या दृष्टीने जो उमेदवार मराठ्यांना मदत करेल, त्यालाच मतदान करा. बाकी राजकारण्यांचा करेक्ट कार्यक्रम करण्याचे आवाहन …

पुढे वाचा

India Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now