🕒 1 min read
IPL 2024 Schedule | भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) IPL 2024 साठी २२ मार्च ते २६ मे दरम्यान आयोजित करण्याचे ठरवले आहे.
या वर्षी देशात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणूकांची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. याचा परिणाम आयपीएलवर होतांना दिसून येत आहे.
महिला प्रीमियर लीग ( WPL )२२ फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याचे बोलले जाते. WPL चा अंतिम सामना १७ मार्च रोजी खेळवला जाऊ शकतो.
यानंतर लगेच पाच दिवसांनी आयपीएल ( IPL 2024 ) सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. IPL 2024 स्पर्धेचा पहिला सामना २२ मार्च रोजी तर अंतिम सामना २६ मे रोजी खेळवण्यात येणार असल्याची शक्यता आहे.
IPL 2024 Schedule | IPL Start On 22 March To 26 May
देशात काही महिन्यांवर लोकसभा निवडणुका आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे. या कारणास्तव, आयपीएलचे संपूर्ण वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही.
BCCI २२ मार्च ते २६ मे अखेरपर्यंत आयपीएल २०२४ चे आयोजन करू शकते. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्यानंतरच आयपीएलचं ( IPL 2024 ) वेळापत्रक जाहीर केलं जाण्याची शक्यता आहे.
आयपीएलच्या १६ व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा पराभव करून पाचव्यांदा विजेतेपद पटकावले होते.
ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज, अफगाणिस्तान, झिम्बाब्वे आणि न्यूझीलंडचे खेळाडूही आयपीएलसाठी उपलब्ध असणार आहेत.
Indian Premier League Teams List 2024
- गुजरात टायटन्स
- मुंबई इंडियन्स
- चेन्नई सुपर किंग्ज
- पंजाब किंग्ज
- रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
- सनरायझर्स हैदराबाद
- राजस्थान रॉयल्स
- कोलकाता नाईट रायडर्स
- दिल्ली कॅपिटल्स
- लखनौ सुपर जायंट्स
महत्वाच्या बातम्या
- IPL 2024 Schedule – सामन्यांच्या तारखा, ठिकाण, संघांचा कर्णधार, संघ मालक; आयपीएलबाबत सर्व माहिती
- T20 World Cup schedule 2024 | वर्ल्ड कप संपूर्ण वेळापत्रक; भारत विरुद्ध पाकिस्तान ‘या’ दिवशी भिडणार
- Rohit Sharma | रोहित शर्माला मुंबई इंडियन्सने पुन्हा डावलले; फॅन्स झाले नाराज
- T20I World Cup 2024 | वर्ल्ड कपसाठी 10 खेळाडूंची नावं जाहीर; वाचा संपूर्ण माहिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











