🕒 1 min read
Chhagan Bhujbal | अंबड: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसी समाज आमने-सामने आले आहेत. याच पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे ( Manoj Jarange ) आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यामध्ये अनेक शब्दिक चकमक झालेली दिसली.
यानंतर आज जालना जिल्ह्यातील अंबड येथे ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभा सुरू असताना छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी मनोज जरांगे यांच्यावर शाब्दिक वार केला आहे.
माझ्या शेपटीवर परत पाय द्यायचा प्रयत्न केलास, तर याद राख, असा इशारा छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी मनोज जरांगे यांना दिला आहे.
Manoj Jarange has spoken a lot about me – Chhagan Bhujbal
छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) म्हणाले, “मनोज जरांगे आतापर्यंत माझ्याबद्दल खूप बोलला आहे. माझ्या शेपटीवर परत पाय द्यायचा प्रयत्न केलास, तर याद राख.जनगणना करा, असं सर्वांचं म्हणणं आहे. आमचं देखील तेच म्हणणं आहे. जनगणना करा म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल. जनगणना करा आणि आम्ही किती आहोत? हे त्यांना दाखवून द्या.
जनगणना झाली पाहिजे. ओबीसी समाजाचा हा पहिला आणि शेवटचा मेळावा नाही. प्रत्येक जिल्ह्यात हे मेळावे झाले पाहिजे. ओबीसी नेते तुम्हाला मार्गदर्शन करतील.
आपली ही ज्योत आता सर्वत्र पेटली पाहिजे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, असं सर्वजण म्हणत आहे. परंतु, कुणबी प्रमाणपत्र मिळालं की ओबीसी आरक्षणाला धक्का लागतो.
पुढे बोलताना ते म्हणाले, “महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासाठी याआधी देखील आंदोलन झाली आहे. मात्र त्यावेळी घर आणि गाड्या जाळल्या गेल्या नव्हत्या.
दगडाला शेंदूर लावून जसं देव करतात तसं मनोज जरांगे यांचं झालं आहे. त्यामुळे मराठा तरुणांना माझं ( Chhagan Bhujbal ) सांगणं आहे की, तुम्ही कुठे जरांगेंच्या मागे लागतात. त्याला काही कळत आणि वळत नाही. तो फक्त लेकरं लेकरं करतो.”
महत्वाच्या बातम्या
- Chhagan Bhujbal | दगडाला शेंदूर लावून जसं देव करतात तसं जरांगेंचं झालंय – छगन भुजबळ
- Sushma Andhare | भाजपची मदत करायची असेल तर ती उघडपणे करावी; सुषमा अंधारेंनी राज ठाकरेंचे कान टोचले
- Chhagan Bhujbal | मनोज जरांगे सासऱ्याच्या जीवावर जगतोय – छगन भुजबळ
- Manoj Jarange | मराठा समाजातील नेत्यांचा पाठिंबा मिळाला तर दोन तासात आरक्षण मिळेल – मनोज जरांगे
- Raj Thackeray | मनोज जरांगेंना कोण बोलायला सांगतंय? राज ठाकरेंची शरद पवारांवर नाव न घेता टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











