Share

Manoj Jarange | मराठा आरक्षणाविरोधात कुणी बोललं तर सोडणार नाही; मनोज जरांगेंचा ओबीसी नेत्यांना इशारा

Manoj Jarange | जालना: राज्यामध्ये मराठा समाज मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आरक्षणासाठी लढत आहे. महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी  प्रमाणपत्र देण्यात यावं, अशी मागणी मराठ्यांनी केली आहे. परंतु, मराठ्यांच्या या मागणीला ओबीसी नेत्यांसह ओबीसी समाजाने विरोध दर्शवला आहे. त्याचबरोबर ओबीसी नेत्यांकडून भव्य सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या सभेला ओबीसीचे बडे नेते देखील हजेरी लावणार … Read more

Published On: 

Manoj Jarange | जालना: राज्यामध्ये मराठा समाज मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आरक्षणासाठी लढत आहे. महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी  प्रमाणपत्र देण्यात यावं, अशी मागणी मराठ्यांनी केली आहे.

परंतु, मराठ्यांच्या या मागणीला ओबीसी नेत्यांसह ओबीसी समाजाने विरोध दर्शवला आहे. त्याचबरोबर ओबीसी नेत्यांकडून भव्य सभेचं आयोजन करण्यात आलं आहे.

या सभेला ओबीसीचे बडे नेते देखील हजेरी लावणार असल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आरक्षणाच्या विरोधात कोणी बोललं तर आम्ही सोडणार नाही, असं मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी म्हटलं आहे.

Manoj Jarange commented on Maratha reservation

प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना मनोज जरांगे (Manoj Jarange) म्हणाले, “मराठा समाज ताकतीने एकत्र येऊ लागला आहे. मराठा समाजाला शंभर टक्के आरक्षण मिळणार आहे, याची मला (Manoj Jarange) पूर्ण खात्री आहे.

आम्ही गोरगरीब मराठा समाजासाठी लढत आहोत. त्याचबरोबर माझा (Manoj Jarange) गोरगरीब समाज देखील लढत आहे. आतापर्यंत आमच्या समाजाने कुणाच्याही विरोधात वाईट वक्तव्य केलेलं नाही.

त्यामुळे मराठा आरक्षणाच्या विरोधात कुणी काही बोललं तर आम्ही त्याला सोडणार नाही. ओबीसी समाजाचा त्यांच्या आरक्षणावर अधिकार आहे. भारतामध्ये लोकशाही आहे.

त्यामुळे प्रत्येकाला सभा घेण्याचा अधिकार आहे. या सभा घेण्यापूर्वी त्यांनी फक्त गोरगरीब मराठ्यांचा विचार करावा. आम्हाला शिक्षणात आणि नोकरीमध्ये आमच्या हक्काचं  आरक्षण हवं आहे.”

दरम्यान, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर ठोस तोडगा काढण्यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी राज्य शासनाला 24 डिसेंबर पर्यंत मुदत दिली आहे. तत्पूर्वी मनोज जरांगे महाराष्ट्रभर दौरा करत आहे. त्यांच्या या दौऱ्याला मराठा समाजाकडून प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही