Share

PM Kisan Yojana | पीएम किसान योजनेचा 15 वा हप्ता कधी मिळणार? पाहा अपडेट

🕒 1 min readPM Kisan Yojana | टीम महाराष्ट्र देशा: देशातील शेतकऱ्यांना आर्थिक पाठिंबा देण्यासाठी केंद्र सरकार वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवत असते. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अतिवृष्टी, दुष्काळ इत्यादी परिस्थितीत आर्थिक मदत मिळते. अशात शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री सन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची … Read more

Published On: 

🕒 1 min read

PM Kisan Yojana | टीम महाराष्ट्र देशा: देशातील शेतकऱ्यांना आर्थिक पाठिंबा देण्यासाठी केंद्र सरकार वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवत असते. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अतिवृष्टी, दुष्काळ इत्यादी परिस्थितीत आर्थिक मदत मिळते.

अशात शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री सन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत करते.

हे सहा हजार रुपये शेतकऱ्यांना 2000 च्या तीन हप्त्यांमध्ये दिले जातात. शेतकऱ्यांना आतापर्यंत या योजनेचे 14 हप्ते मिळाले आहे. यानंतर शेतकरी आता या योजनेतील 15 व्या हप्त्याची वाट बघत आहे.

15th installment may be released in the month of November

आतापर्यंत शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान योजनेतील (PM Kisan Yojana) 14 हप्ते मिळाले आहेत. त्यानंतर शेतकरी आता या योजनेतील 15 वा हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहे.

अशात 15 व्या हप्ताबाबत अपडेट समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, प्रधानमंत्री किसान योजनेतील पंधरावा हप्ता नोव्हेंबर महिन्यात जारी केला जाऊ शकतो.

मात्र, याबाबत केंद्र सरकारकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. या योजनेतील पंधराव्या हप्त्याचा लाभ मिळवायचा असेल तर शेतकऱ्यांना जमिनीची पडताळणी, आधार कार्ड लिंक आणि ईकेवायसी करणं अत्यंत गरजेचं आहे.

दरम्यान, अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी केंद्र सरकारने 24 फेब्रुवारी 2019 रोजी प्रधानमंत्री किसान योजना (PM Kisan Yojana) सुरू केली आहे.

या योजनेचा करोडो शेतकऱ्यांना आतापर्यंत लाभ मिळाला आहे. तर ज्या शेतकऱ्यांनी अजून या योजनेसाठी नोंदणी केलेली नाही, त्यांनी लवकरात लवकर या योजनेसाठी नोंदणी करून घ्यावी.

https://pmkisan.gov.in या वेबसाईटला भेट देऊन शेतकरी या योजनेसाठी नोंदणी करू शकतात. त्याचबरोबर पीएम किसान योजनेमध्ये शेतकऱ्यांना काही समस्या आढळून आल्या तर शेतकरी त्यांच्या समस्या pmkisan-ict@gov.in या ईमेलवर नोंदवू शकतात.

तर योजनेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी शेतकरी या 155261 किंवा 1800115526 किंवा 011-23381092 क्रमांकावर संपर्क करू शकतात.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!