Shambhuraj Desai | सुषमा अंधारे यांना कायदेशीर नोटीस देणार – शंभूराजे देसाई

Shambhuraj Desai | टीम महाराष्ट्र देशा: ड्रग्स माफिया ललित पाटील पुणे शहरातील ससून रुग्णालयातून फरार झाला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याला चेन्नईमधून अटक केली आहे. त्याला कोर्टात हजर करण्यापूर्वी त्याच्या चेहऱ्यावर कपडा टाकून त्याला रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना खळबळजनक विधान केलं आहे. मी पळून गेलो नव्हतो, मला … Read more

Published On: 

Shambhuraj Desai | टीम महाराष्ट्र देशा: ड्रग्स माफिया ललित पाटील पुणे शहरातील ससून रुग्णालयातून फरार झाला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याला चेन्नईमधून अटक केली आहे.

त्याला कोर्टात हजर करण्यापूर्वी त्याच्या चेहऱ्यावर कपडा टाकून त्याला रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना खळबळजनक विधान केलं आहे.

मी पळून गेलो नव्हतो, मला पळवलं होतं, असं ललित पाटील (Lalit Patil) यांनी म्हटलं आहे. ललित पाटील याच्या वक्तव्यावरून सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी शंभूराज देसाई यांना धारेवर धरलं. सुषमा अंधारे यांच्या या टीकेला शंभूराजे देसाई यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

The statement made by Sushma Andhare is very funny – Shambhuraj Desai

शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) म्हणाले, “सुषमा अंधारे यांनी केलेलं वक्तव्य अत्यंत हास्यस्पद आहे. त्यांच्या या वक्तव्याला आम्ही कायदेशीर मार्गाने उत्तर देऊ. ललित पाटील या व्यक्तीशी माझं काहीही संबंध नाही, त्याचबरोबर मी त्याला ओळखत नाही.

काहीही संबंध नसताना या प्रकरणात माझं नाव घेतलं जात आहे. त्यामुळे मी सुषमा अंधारे यांना कायदेशीर नोटीस पाठवणार. उद्धव ठाकरे यांनी सुषमा अंधारे यांना आमदारकी किंवा खासदारकी द्यावी यासाठी ते अशा प्रकारचे विधान करत आहेत.

त्या निवडून येऊ शकत नाही, म्हणून ते बेजबाबदार वक्तव्य करत आहे. लाखोंमधून आम्ही निवडून येतो. मात्र, अंधारेंची धडपड तिकीट मिळवण्यासाठी सुरू आहे.”

दरम्यान, ललित पाटील यांच्या विधानावरून सुषमा अंधारे यांनी दादा भुसे आणि शंभूराजे देसाई (Shambhuraj Desai) यांना धारेवर धरलं आहे.

“ललित पाटील पळून गेला नव्हता, त्याला पळवून लावलं होतं. यामध्ये राजकीय नेत्यांचा सहभाग आहे. दादा भुसे आणि शंभूराजे देसाई यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे. हे प्रकरण केंद्रीय तपास द्या.”

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही