Share

Weather Update | येत्या 48 तासांत ‘या’ भागात कोसळणार परतीचा पाऊस

🕒 1 min readWeather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यासह देशातून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्राच्या काही भागातून मान्सून माघारी फिरला आहे. मान्सून माघारी फिरल्याने तापमानात वाढ झालेली दिसत आहे. मान्सून मागे फिरला असला तरी देशाच्या काही भागात पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. पुढील दोन दिवसात राज्यासह देशातून नैऋत्य मान्सून … Read more

Published On: 

🕒 1 min read

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यासह देशातून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्राच्या काही भागातून मान्सून माघारी फिरला आहे.

मान्सून माघारी फिरल्याने तापमानात वाढ झालेली दिसत आहे. मान्सून मागे फिरला असला तरी देशाच्या काही भागात पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. पुढील दोन दिवसात राज्यासह देशातून नैऋत्य मान्सून माघारी फिरण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडीसा, महाराष्ट्र तेलंगणा, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या राज्यातील बहुतांश भागातून नैऋत्य मान्सून परतीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे.

त्याचबरोबर 12 ऑक्टोबर नंतर ईशान्य भारत, दक्षिण भारत आणि बेटांवर दोन दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून (Weather Update) वर्तवण्यात आली आहे.

Light to moderate rainfall is expected in most parts of the state

मान्सून परत फिरला असला तरी देशातील बहुतांश ठिकाणी पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे. कर्नाटक, तमिळनाडू, सिक्किम, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर या भागात पुढील 24 तास जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

तर राज्यातील बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 12 ऑक्टोबर पर्यंत देशातील बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

तोपर्यंत नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेऊन घराबाहेर पडावे, असे आवाहन हवामान खात्याकडून (Weather Update) करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!