Share

Ajit Pawar | राष्ट्रवादीचं नाव आणि चिन्ह कोणाचं? अजित पवारांनी बोलवली समर्थक आमदारांची बैठक

Ajit Pawar | मुंबई: जुलै महिन्याच्या सुरुवातीला राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला होता. 02 जुलै 2023 रोजी अजित पवार शरद पवारांना (Sharad Pawar) सोडून भाजप-शिंदे सरकारमध्ये सामील झाले. अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले. राष्ट्रवादीच्या फूटीनंतर दोन्ही गटाने पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर दावा ठोकत निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. याच … Read more

Published On: 

Ajit Pawar | मुंबई: जुलै महिन्याच्या सुरुवातीला राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला होता. 02 जुलै 2023 रोजी अजित पवार शरद पवारांना (Sharad Pawar) सोडून भाजप-शिंदे सरकारमध्ये सामील झाले.

अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले. राष्ट्रवादीच्या फूटीनंतर दोन्ही गटाने पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर दावा ठोकत निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर अजित पवारांनी आज समर्थक आमदारांची बैठक बोलावली असल्याची माहिती मिळाली आहे.

The meeting has been organized at Ajit Pawar’s Devagiri bungalow

06 ऑक्टोबर 2023 पासून निवडणूक आयोगासमोर राष्ट्रवादीची सुनावणी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर अजित पवार (Ajit Pawar) यांनी समर्थक आमदारांची बैठक बोलावली आहे.

अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या ठिकाणी समर्थक आमदारांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं आहे.

अजित पवार गटानं विधानसभेतील 53 पैकी 43 आमदार असल्याचा दावा केला आहे. तर विधान परिषदेतील 09 पैकी 06 आमदार आपल्यासोबत असल्याचं म्हटलं आहे. आज होणाऱ्या या बैठकीमध्ये आगामी रणनीती ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर शरद पवार गट आणि अजित पवार (Ajit Pawar) गट दोघेही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले आहे.

अशात अजित पवार गटाने समर्थक आमदारांची बैठक बोलावली आहे. त्यांच्या या बैठकीमध्ये नक्की काय चर्चा होईल? याबाबत आता राज्याच्या राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात आहे. त्याचबरोबर अजित पवार गटाच्या या बैठकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं  आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही