Share

Bacchu Kadu | CM शिंदेंना मुख्यमंत्री पदावरून हटवल्यास भाजपला परिणाम भोगावे लागतील – बच्चू कडू

Bacchu Kadu | अमरावती: अजित पवार सत्तेत सामील झाल्यानंतर ते मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाल्या. या चर्चेनंतर शिंदे गटातील आमदारांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली होती. अशात आता प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) मुख्यमंत्री पदावरून हटवल्यास भाजपला परिणाम भोगावे लागतील, असं बच्चू कडू … Read more

Published On: 

Bacchu Kadu | अमरावती: अजित पवार सत्तेत सामील झाल्यानंतर ते मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाल्या. या चर्चेनंतर शिंदे गटातील आमदारांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली होती.

अशात आता प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) मुख्यमंत्री पदावरून हटवल्यास भाजपला परिणाम भोगावे लागतील, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. बच्चू कडू यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना बच्चू कडू (Bacchu Kadu) म्हणाले, “एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावरून हटवल्यास भारतीय जनता पक्षाला परिणाम भोगावे लागू शकतात.

शिंदेंना मुख्यमंत्री पदावरून हटवल्यास पाच ते दहा टक्के मतदार नाराज होतील. त्यामुळे शिंदेंना मुख्यमंत्री पदावरून हटवल्यास भाजपचे प्लॅन कामी येणार नाही.” आमदार बच्चू कडू यांच्या या वक्तव्यावर भारतीय जनता पक्षाकडून काय प्रतिक्रिया येईल? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

The government should end the issue of reservation – Bacchu Kadu

गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगला तापला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी जालना जिल्ह्यामध्ये तीव्र आंदोलन सुरू आहे.

मराठा समाजानंतर आरक्षणासाठी धनगर आणि मुस्लिम समाज देखील आक्रमक झाला आहे. आरक्षणासाठी हे दोन्ही समाज देखील आंदोलन करताना दिसत आहे.

या सर्व प्रकरणावर आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले, “सरकारने एकदाच आरक्षणाचा मुद्दा संपून टाकायला हवा.

आरक्षण विषय हा राजकीय लोकांनी केलेली जातीय व्यवस्था आहे. आगामी निवडणुकांमध्ये जातीय मुद्दे घेऊन मत मागितले जाणार. त्याचबरोबर आरक्षणाचा मुद्दा पुढे ठेवून मतं मागितली जाणार.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही