Share

Eknath Shinde | व्हायरल व्हिडिओ क्लिपवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया; म्हणाले…

Eknath Shinde | मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती. या बैठकीपूर्वी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषद घेतली होती. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा या पत्रकार परिषदेतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या … Read more

Published On: 

Eknath Shinde | मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती.

या बैठकीपूर्वी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषद घेतली होती. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा या पत्रकार परिषदेतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या व्हिडिओवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. अशात या प्रकरणावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

It has all been misrepresented on social media

व्हायरल व्हिडिओ प्रकरणावर प्रतिक्रिया देत असताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, “मी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार पत्रकार परिषदेसाठी जेव्हा आलो, त्यावेळी आम्ही एकमेकांशी संवाद साधत होतो.

मराठा आरक्षणाबाबत आपल्यात जी सकारात्मक चर्चा झाली आहे, त्यावर आपण बोलूयात. या व्यतिरिक्त कोणत्याही राजकीय गोष्टींवर प्रतिक्रिया नको. त्याचबरोबर जास्त प्रश्न उत्तर नको, अशी आमची त्यावेळी चर्चा सुरू होती.

मात्र, सोशल मीडियावर हे सर्व चुकीच्या पद्धतीने मांडले गेले आहे. मागचे पुढचे शब्द काढून लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. ज्या लोकांनी हे केलं आहे, ते मराठा समाजाबाबत किती संवेदनशील आहे, हे यातून दिसून आलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

आपण बोलून मोकळं व्हायचं आणि निघून जायचं, असं एकनाथ शिंदे या व्हिडिओमध्ये म्हणताना दिसत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या वक्तव्यावर अजित पवार यांनी हो हो म्हणत प्रतिक्रिया दिली आहे.

त्यानंतर फडणवीस यांनी दोघांना माईक चालू असल्याची आठवण करून दिली आहे. सर्व प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला असून सोशल  मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही