Share

Maratha Reservation | मराठ्यांना आरक्षण मिळणार? जरांगेंचं उपोषण एका महिन्यासाठी मागे

Maratha Reservation | जालना: मराठवाड्यातील जालना जिल्ह्यामध्ये गेल्या पंधरा दिवसापासून मनोज जरांगे (Manoj Jarange) मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आंदोलन करत आहे. मराठवाड्यातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र घ्यावं, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. जरांगे यांच्या मागणीवर विचार आणि चर्चा करण्यासाठी सरकारने एक महिन्याचा वेळ मागितला आहे. याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी एक … Read more

Published On: 

Maratha Reservation | जालना: मराठवाड्यातील जालना जिल्ह्यामध्ये गेल्या पंधरा दिवसापासून मनोज जरांगे (Manoj Jarange) मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आंदोलन करत आहे.

मराठवाड्यातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र घ्यावं, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. जरांगे यांच्या मागणीवर विचार आणि चर्चा करण्यासाठी सरकारने एक महिन्याचा वेळ मागितला आहे. याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

The government has sought one month’s time to fulfill the demand of Manoj Jarange

मनोज जरांगे यांनी सरसकट मराठा समाजाला (Maratha Reservation) कुणबी प्रमाणपत्र घ्यावं, अशी मागणी केली आहे. मनोज जरांगे यांची मागणी पूर्ण करण्यासाठी सरकारने एक महिन्याचा वेळ मागितला आहे.

मराठा समाजाचे आरक्षण कायद्याच्या पातळीवर टिकवण्यासाठी अभ्यासाची करण्याची गरज आहे, असं सरकारने म्हटलं आहे. याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण एका महिन्यासाठी मागे घेतलं आहे.

उपोषण मागे घेतलं असलं तरी जरांगे यांचं आंदोलन सुरूच राहणार आहे. एक महिन्यानंतर मराठा समाजाला आरक्षण नाही मिळालं तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिला आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न सोडवण्यासाठी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याचा ठराव एकमताने मंजूर झाला आहे.

यावर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “आपण सर्व एकत्र आल्यामुळे सरकारला हा निर्णय घ्यावा लागला आहे. मात्र आरक्षण पत्र सर्वसामान्य मराठ्यांच्या हातात पडेपर्यंत आंदोलन थांबणार नाही.

मी अत्यंत पारदर्शकपणे काम करतो. त्यामुळे मी तुमच्यापुढे अजिबात जाणार नाही. त्याचबरोबर तुम्हाला विचारल्याशिवाय मी कोणताही निर्णय घेणार नाही.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

तुमच्या प्रश्नाचे उत्तर आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास Web Search fallback वापरला जाऊ शकतो.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही