Share

Rohit Pawar | राज्य सरकारच कंपनीला कंत्राटी पद्धतीने चालवायला द्या – रोहित पवार

Rohit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: आज सरकार कंत्राटी भरतीसाठी जीआर काढणार आहे. सगळीकडे या कंत्राटी भरतीचं गुणगान सुरू आहे. प्रायव्हेट कंपन्यांना फायदा देण्यासाठी हा जीआर काढला जात असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे. कंत्राटी भरतीची एवढीच हाऊस … Read more

Published On: 

Rohit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: आज सरकार कंत्राटी भरतीसाठी जीआर काढणार आहे. सगळीकडे या कंत्राटी भरतीचं गुणगान सुरू आहे. प्रायव्हेट कंपन्यांना फायदा देण्यासाठी हा जीआर काढला जात असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहे.

याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे. कंत्राटी भरतीची एवढीच हाऊस असेल तर राज्य सरकार कंपनीला कंत्राटी पद्धतीने चालवायला द्या असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

Today they are releasing GR for contract recruitment – Rohit Pawar 

ट्विट करत रोहित पवार म्हणाले, “एका सरकारी कर्मचाऱ्याच्या पगारात तीन #कंत्राटी_कर्मचारी काम करतील या आशयाचे एका बड्या नेत्याचे वक्तव्य ऐकूण व बदलती भूमिका बघून आश्चर्य वाटले.

याच दृष्टीने विचार केला तर एका आमदारावर, खासदारावर होणाऱ्या करोडो रुपयांच्या शासकीय खर्चात हजारो कर्मचारी काम करतील.

पुढे ते म्हणाले, “बंडखोर आमदारांच्या सुरक्षेवर १५० कोटी खर्चासाठी, #शासन_आपल्या_दारी च्या एकेका सभेसाठी ८-१० कोटी व त्याच्या जाहिरातीवर ५२ कोटी, सरकारने गेल्या वर्षी केलेल्या कामांची यावर्षी जाहिरात करण्यासाठी शेकडो कोटी खर्च करताना काटकसर करावी, असा विचार शासन कधी करत नाही. शासकीय खर्चाची #उधळमाप शासनाला चालते. मग #नोकर_भरती साठीच शासन एवढा बारीक विचार का करते?”

“सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांकडून #परीक्षा फीच्या माध्यमातून हजारो कोटींची वसुली करूनही पारदर्शक परीक्षा न घेऊ शकलेले सरकार प्रायव्हेट कंपन्यांना फायदा देण्यासाठी आज #कंत्राटी #भरतीसाठी जीआर काढत आहेत.

केंद्र सरकार प्रमाणे कंत्राटी भरतीचे गुणगान गात आहे. सरकारला #कंत्राटी_भरती ची एवढीच हौस असेल तर राज्य सरकारच कंपनीला कंत्राटी पद्धतीने चालवायला द्या”, असही त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही