Share

Vijay Wadettiwar | अजित पवारांचा बंदोबस्त करण्यासाठी शरद पवार मैदानात उतरले – विजय वडेट्टीवार

Vijay Wadettiwar | नागपूर: अजित पवार (Ajit Pawar) आमचेच नेते आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडलेली नाही, असं सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी म्हटलं होतं. काल (25 ऑगस्ट) सकाळी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना शरद पवारांनी (Sharad Pawar) सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्याला दुजोरा दिला होता. मात्र, त्यानंतर काही तासांत शरद पवारांनी यूटर्न घेतला. अजित … Read more

Published On: 

Vijay Wadettiwar | नागपूर: अजित पवार (Ajit Pawar) आमचेच नेते आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडलेली नाही, असं सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी म्हटलं होतं.

काल (25 ऑगस्ट) सकाळी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना शरद पवारांनी (Sharad Pawar) सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्याला दुजोरा दिला होता.

मात्र, त्यानंतर काही तासांत शरद पवारांनी यूटर्न घेतला. अजित पवार आमचे नेते आहे, असं मी म्हटलं नसल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं.

याच पार्श्वभूमीवर विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांचा बंदोबस्त करण्यासाठी शरद पवारांनी हे पाऊल उचललं असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

Sharad Pawar has entered the field stubbornly – Vijay Wadettiwar

नागपूरमध्ये प्रसार माध्यमांची बातचीत करत असताना विजय वडेट्टीवार म्हणाले, “शरद पवार जिद्दीने मैदानात उतरले आहे. शरद पवार यांनी केलेल्या विधानाचा राज्याच्या राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या पद्धतीने अर्थ काढला जात आहे.

अजित पवारांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी शरद पवारांनी हे पाऊल उचललं असेल. शरद पवारांचं हे पाऊल नक्की यशस्वी ठरणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार असल्याची भूमिका अजित पवार गटातील नेत्यांनी घेतली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेल्या नऊ आमदार आणि दोन खासदारांवर शरद पवार गटाने कारवाई केली आहे.”

“शरद पवार पुरोगामी विचारांना धरून चालणारे नेते आहे. हे विचार शरद पवारांच्या सोबत कायम राहतील. शरद पवार यांनी अजित पवारांबद्दल केलेल्या वक्तव्य मागे नक्कीच काहीतरी रणनीती असू शकते.

त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याचा आम्हाला फारसा वेगळा अर्थ दिसत नाही. शरद पवार इंडिया आघाडीसोबत आहे. त्याचबरोबर ते महाविकास आघाडी सोबत देखील कायम राहतील.

शरद पवार जे काय मत मांडतात त्यातून इंडिया आणि महाविकास आघाडीला फायदा होतो, असं माझं वैयक्तिक मत आहे”, असही वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही