Share

Jitendra Awhad | कुणी शरद पवारांना ऑफर देऊ शकतो, हा मोठा जोक – जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad | ठाणे: काही दिवसांपूर्वी अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांची गुप्त बैठक पार पडली होती. त्यांच्या या बैठकीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांना जर मुख्यमंत्री व्हायचं असेल तर त्यांना शरद पवारांना भाजप सोबत घेऊन यावं लागेल, असं नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं … Read more

Published On: 

Jitendra Awhad | ठाणे: काही दिवसांपूर्वी अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांची गुप्त बैठक पार पडली होती. त्यांच्या या बैठकीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवारांना जर मुख्यमंत्री व्हायचं असेल तर त्यांना शरद पवारांना भाजप सोबत घेऊन यावं लागेल, असं नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

विजय वडेट्टीवार यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांना कोणी ऑफर देऊ शकतो, हा मोठा जोक असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

Sharad Pawar has clarified that he will not go with BJP – Jitendra Awhad

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले, “शरद पवार यांची लोकसभेतील कारकीर्द किती? त्यांना ऑफर कोण देणार? शरद पवारांना कोणी ऑफर देऊ शकतो, हा या वर्षातील सर्वात मोठा जोक आहे.

मात्र, ज्यांना काय बोलायचं आहे त्यांना ते बोलू द्या. कारण शरद पवार यांनी भाजपसोबत जाणार नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. मी जातीयवादी पक्षासोबत जाणार नाही.

मी पुरोगामी विचारांचा पुरस्कार करतो आणि तेच विचार मला पुढे घेऊन जायचे आहे, असं शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागेपुढे ती लोक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

शरद पवार आतापर्यंत पुरोगामी विचार घेऊन चालले आहे. यापुढेही ते पुरोगामी विचारांवर चालतील.

कळवा येथील महानगरपालिका रुग्णालयांमध्ये एकाच दिवशी 18 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले, “याला-त्याला दोष देण्यापेक्षा हॉस्पिटलची परिस्थिती सुधारावी.

या प्रकरणामध्ये आमची काही चूक झाली असेल तर आम्ही हॉस्पिटल समोर जाऊन नाक घासून माफी मागायला तयार आहोत. मात्र, ज्या लोकांचा मृत्यू झाला आहे त्यांचं काय करायचं?

या दुर्दैवी घटनेनंतर दोन दिवस त्या ठिकाणी कोणी आलं नाही. त्यामुळं उगाच आम्हाला बोलायला लावू नका. घटनेचं थोडं गांभीर्य समजून घ्या. त्या रुग्णालयामध्ये काय कमतरता आहे ते बघा.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही