Share

Eknath Shinde | एकनाथ शिंदेंना भाजपकडून मोठा धक्का! कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्याचा आग्रह

🕒 1 min readEknath Shinde | टीम महाराष्ट्र देशा: आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षानं जोरदार तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील एनडीए खासदारांसोबत बैठक देखील पार पडली. अशात भाजपकडून शिंदे गटाला मोठा धक्का मिळण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणूक शिंदे गटानं कमळ चिन्हावर लढवावी, असा आग्रह भाजपनं धरला असल्याचं … Read more

Published On: 

🕒 1 min read

Eknath Shinde | टीम महाराष्ट्र देशा: आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षानं जोरदार तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील एनडीए खासदारांसोबत बैठक देखील पार पडली.

अशात भाजपकडून शिंदे गटाला मोठा धक्का मिळण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणूक शिंदे गटानं कमळ चिन्हावर लढवावी, असा आग्रह भाजपनं धरला असल्याचं बोललं जात आहे. या माहितीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

The Shinde group should contest the Loksabha elections on the lotus symbol

नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आगामी लोकसभा निवडणुकांसाठी तयारी सुरू केली आहे. यासाठी भारतीय जनता पक्ष वेगवेगळ्या बैठका देखील आयोजित करत आहे.

भाजपनं पक्ष पातळीवर देखील निवडणुकांसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. अशात भाजप मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटाला मोठा झटका देणार असल्याच्या चर्चा सुरू आहे.

शिवसेना शिंदे गटानं (Eknath Shinde) आगामी लोकसभा निवडणूक कमळ चिन्हवर लढवावी, अशा चर्चा संसदेच्या अधिवेशन काळात सुरू होत्या.

भाजपच्या या भूमिकेनंतर शिंदे गटाच्या आमदार आणि खासदारांची गोची झाली असल्याचं बोललं जात आहे. कारण शिंदे गटाला भाजपच्या या प्रस्तावाला होकार देखील देता येत नाही आणि विरोधी करता येत नाही. इकडे आड तिकडे विहीर, अशी शिंदे गटातील आमदारांची अवस्था झाली आहे.

दरम्यान, आज प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटावर खोचक टीका केली आहे.

ते म्हणाले, “मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी काल त्यांच्या आमदारांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन केलं होतं. मात्र, अचानक हा कार्यक्रम रद्द करण्यात आला.

कारण एकनाथ शिंदे यांना माहीत होतं की, जेवणामध्ये त्यांचे आमदार मारामाऱ्या करतील. काल मुख्यमंत्री शिंदे यांचं हेलिकॉप्टर उडू शकलं नाही. यावरून हे लक्षात येत आहे की त्यांच्या बाजूनं निसर्ग आणि जनता दोन्हीही नाही.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!