Share

Ajit Pawar | काका-पुतणे आमने-सामने! रोहित पवारांच्या आंदोलनावर अजित पवारांची टीका, म्हणाले…

Ajit Pawar | मुंबई: आज विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज्य सरकारविरुद्ध विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं आहे. दबावाच्या राजकारणाला बळी पडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, असं रोहित पवार यांनी यावेळी म्हटलं आहे. रोहित पवारांच्या या आंदोलनावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोकप्रतिनिधींनी अशा पद्धतीनं बसणं उचित नाही, असं अजित … Read more

Published On: 

Ajit Pawar | मुंबई: आज विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज्य सरकारविरुद्ध विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं आहे.

दबावाच्या राजकारणाला बळी पडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, असं रोहित पवार यांनी यावेळी म्हटलं आहे. रोहित पवारांच्या या आंदोलनावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोकप्रतिनिधींनी अशा पद्धतीनं बसणं उचित नाही, असं अजित पवार म्हणाले आहे.

It is not appropriate for people’s representatives to sit in such a manner – Ajit Pawar

रोहित पवारांच्या आंदोलनावर बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “अजून अधिवेशन संपलेलं नाही. अधिवेशन सुरू होऊन आत्ताशी एक आठवडा झाला आहे.

आंदोलन मागे घेण्यासाठी स्वतः मंत्रिमहोदय पत्र देतात. त्यामुळे निवेदन केल्यानंतर लोकप्रतिनिधींनी त्याची गंभीरतेनं नोंद घ्यायला हवी. लोकप्रतिनिधींनी अशा पद्धतीने बसणं उचित नाही.”

दरम्यान (Ajit Pawar), कर्जत-जामखेडच्या तरुणांना रोजगार मिळालाच पाहिजे, असं म्हणत रोहित पवारांनी विधान भवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आंदोलन सुरू केलं.

त्यांच्या या आंदोलनामुळं सभागृहात विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आलं आहे.

मात्र, त्या जागेचा पवित्र राखलं पाहिजे, असं मत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी व्यक्त केलं आहे.

रोहित पवारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन किंवा उपोषण करू नये. त्यांचं जे काही मत आहे, त्यांनी ते सभागृहात येऊन मांडायला हवं. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करणे योग्य नाही”, असेही राहुल नार्वेकरांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही