Share

Opposition Party | जितेगा भारत! विरोधकांच्या INDIA ची टॅगलाईन ठरली

Opposition Party | टीम महाराष्ट्र देशा: आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. सत्ताधाऱ्यांच्या एनडीए (NDA) ला टक्कर देण्यासाठी विरोधकांनी इंडिया (INDIA) आघाडी उभारली आहे. अर्थात इंडियन नॅशनल डेमोक्रॅटिक इंक्लुसिव्ह अलायन्स (Indian National Democratic Inclusive Alliance). यानंतर आता विरोधी पक्षाच्या आघाडीची टॅगलाईन देखील निश्चित करण्यात आली आहे. The opposition party formed an … Read more

Published On: 

Opposition Party | टीम महाराष्ट्र देशा: आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. सत्ताधाऱ्यांच्या एनडीए (NDA) ला टक्कर देण्यासाठी विरोधकांनी इंडिया (INDIA) आघाडी उभारली आहे.

अर्थात इंडियन नॅशनल डेमोक्रॅटिक इंक्लुसिव्ह अलायन्स (Indian National Democratic Inclusive Alliance). यानंतर आता विरोधी पक्षाच्या आघाडीची टॅगलाईन देखील निश्चित करण्यात आली आहे.

The opposition party formed an alliance called ‘India’ to face the BJP alliance

भाजप आघाडीचा सामना करण्यासाठी विरोधकांनी (Opposition Party) ‘इंडिया’ नावाची आघाडी उभारली आहे. त्यानंतर विरोधकांनी आता आपल्या आघाडीची टॅगलाईन देखील निश्चित केली आहे. ‘जीतेगा भारत’ ही इंडिया आघाडीची टॅगलाईन आहे.

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ही टॅगलाईन सुचवली असल्याचं बोललं जात आहे. त्याचबरोबर या आघाडीला हिंदी टॅगलाईन असावी, असं देखील उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या (Opposition Party) आघाडीची लवकरच मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये विरोधी आघाडीतील 11 सदस्यांची समन्वय समिती स्थापन करण्यात येणार आहे.

या बैठकीमध्ये या सदस्यांची नावे देखील जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, इंडियामध्ये (Opposition Party) काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, जेएमएम, आम आदमी पार्टी, नॅशनल कॉन्फरन्स, शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, सीपीआय, सीपीएम सारखे तब्बल 26 राजकीय पक्ष सामील झाले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही