Share

Neelam Gorhe | “सटरफटर लोकांमुळे नाराज…”; नीलम गोऱ्हे यांचा सुषमा अंधारेंवर घणाघात

Neelam Gorhe | मुंबई: ठाकरे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी शिंदे-भाजप सरकारमध्ये प्रवेश केला. पक्षप्रवेश करत असताना त्यांनी सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. सुषमा अंधारे ठाकरे गटात आल्यामुळे गटातील महिला नेत्या … Read more

Published On: 

Neelam Gorhe | मुंबई: ठाकरे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी शिंदे-भाजप सरकारमध्ये प्रवेश केला. पक्षप्रवेश करत असताना त्यांनी सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

सुषमा अंधारे ठाकरे गटात आल्यामुळे गटातील महिला नेत्या नाराज असल्याच्या चर्चा आहेत. या चर्चांमुळे तुम्ही ठाकरे गट सोडला का? या प्रश्नाचं उत्तर देताना नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) म्हणाल्या, “पक्षात सटरफटर लोक आल्यानं आम्ही नाराज नाही.”

Under the leadership of Eknath Shinde, Shivsena is moving in the right direction – Neelam Gorhe

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना योग्य मार्गावर जात आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदे हिंदुत्वाला पुढे नेण्याचं काम करत आहे. या सरकारनं अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आहे. त्यामुळे मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे”, असही त्या (Neelam Gorhe) यावेळी म्हणाल्या.

दरम्यान, बंडाच्या एक वर्षानंतर ही ठाकरे गटातील नेते शिंदे गटात सहभागी होत आहे. यामुळे ठाकरे गटाच्या चिंतेत वाढ होत चालली आहे. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांच्याआधी मनीषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कानल देखील शिंदे गटात सामील झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही