Dhananjay Munde | आनंदाचा डोह असो किंवा दुःखाचा सागर बहीण भावाचे नाते कायम अबाधित; धनंजय मुंडेंचं ‘ते’ ट्विट चर्चेत

Dhananjay Munde | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) पुन्हा एकदा एकत्र आले आहे. याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांना औक्षण करताना दिसत आहे. Dhananjay Munde’s tweet about Pankaja Munde ट्विट करत धनंजय मुंडे (Dhananjay Munde) … Read more

Published On: 

Dhananjay Munde | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) पुन्हा एकदा एकत्र आले आहे. याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांना औक्षण करताना दिसत आहे.

Dhananjay Munde’s tweet about Pankaja Munde

ट्विट करत धनंजय मुंडे (Dhananjay Munde) म्हणाले, “राज्याच्या मंत्रिपदी नियुक्ती झाल्यानंतर माझ्या भगिनी तथा भाजपचे राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे ताईने माझे औक्षण केले आणि शुभेच्छा दिल्या. भाजपची राष्ट्रीय सचिव म्हणून मीही ताईचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आनंदाचा डोह असो किंवा दुःखाचा सागर बहीण-भावाचे नाते कायम अबाधित आहे.”

धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी शेअर केलेला हा भावा बहिणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकरी संमिश्र प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. त्याचबरोबर या व्हिडिओनंतर राजकीय वर्तुळ चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, आज दुपारी 12.30 वाजता पंकजा मुंडे माध्यमांशी संवाद साधणार आहे. पंकजा मुंडे यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. पंकजा मुंडे यांची ही पत्रकार परिषद त्यांच्या वरळी येथील कार्यालयात होणार आहे. पंकजा मुंडे या पत्रकार परिषदेमध्ये (Dhananjay Munde) काय बोलतील? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही