🕒 1 min read
Uday Samant | मुंबई: अजित पवार (Ajit Pawar) सत्तेत सामील झाल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) राजीनामा देणार असल्याचं बोललं जात होतं. त्याचबरोबर अजित पवार आल्यानं शिंदे गट नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. या सर्व चर्चांना उदय सामंत यांनी पूर्णविराम दिला आहे. याबद्दल उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
Chief Minister Eknath Shinde will not resign – Uday Samant
उदय सामंत (Uday Samant) म्हणाले, “एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राजीनामा देणार नाही. आम्ही राजीनामा देणारे नाही तर राजीनामा घेणारे लोक आहोत. त्याचबरोबर ठाकरे गटात कुणीच परत जाणार नाही. राष्ट्रवादी सत्तेत सामील झाल्याने शिंदे गट नाराज नाही.”
पुढे बोलताना ते (Uday Samant) म्हणाले, “एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका होतील, असं देवेंद्र फडणवीस वारंवार सांगत आहे. आमचे आमदार कोणाच्याही संपर्कात नाही. लवकरच खाते वाटप केलं जाणार आहे.”
दरम्यान, शिंदे गटाचे 08 ते 10 आमदार ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा विनायक राऊत यांनी केला आहे. ते म्हणाले, “पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही आमदारांच्या संपर्कात आहेत. त्याचबरोबर ज्यांना मंत्रिपद जाण्याची भीती आहे, ते आमदार देखील आमच्या संपर्कात आहेत. शिंदे गटाला फक्त दोन मंत्री पद मिळणार असल्यामुळे शिंदे गटात (Uday Samant) मोठा वाद झाला आहे.”
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis | सिंचन घोटाळ्यातील बैलगाडी भर पुराव्यांचं करायचं काय? नेटकऱ्यांचा देवेंद्र फडणवीसांना खडा सवाल
- Sanjay Raut | महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळणार हे नक्की – संजय राऊत
- Uddhav Thackeray | शिंदेंचे आमदार ठाकरे गटात परतणार; ठाकरे गटाचा दावा
- Eknath Shinde | अजित पवारांची होणार गोची! 2024 पर्यंत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर कायम
- Chandrashekhar Bawankule | सरकारमधून शिंदे गट बाहेर पडणार? चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टचं सांगितलं
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











