Share

Thackeray Group | “स्वतःला छत्रपतींचे वंशज समजणाऱ्यांनो तुम्हाला तर…”; ठाकरे गटातील प्रवक्त्यांना शिंदे गटाकडून जिवे-मारण्याची धमकी

Thackeray Group | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यामध्ये औरंगजेबाच्या मुद्द्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. औरंगजेबाचे पोस्टर आणि फोटो स्टेटसला ठेवल्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे. एकीकडे हा वाद सुरू असताना दुसरीकडे ठाकरे गटाच्या प्रवक्त्यांना जीवे-मारण्याची धमकी दिली असल्याची माहिती मिळाली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)  यांनी याबद्दल ट्विट केलं आहे. Do … Read more

Published On: 

Thackeray Group | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यामध्ये औरंगजेबाच्या मुद्द्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. औरंगजेबाचे पोस्टर आणि फोटो स्टेटसला ठेवल्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे. एकीकडे हा वाद सुरू असताना दुसरीकडे ठाकरे गटाच्या प्रवक्त्यांना जीवे-मारण्याची धमकी दिली असल्याची माहिती मिळाली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)  यांनी याबद्दल ट्विट केलं आहे.

Do you consider yourself a descendant of the Chhatrapati?

ठाकरे गटाचे (Thackeray Group) प्रवक्ते आनंद दुबे (Anand Dubey) इंडिया टीव्हीवर एका चर्चासत्रामध्ये सामील झाले होते. चर्चासत्र सुरू असताना त्यांना फोन आला. मात्र सत्र सुरू असल्यामुळे ते फोन उचलू शकले नाही. चर्चासत्र संपल्यानंतर त्यांनी त्या नंबरवर कॉल केला. “तू स्वतःला छत्रपतींचा वंशज समजत आहे का? जास्त बोलू नको. जास्त बोलला तर तुला गोळ्या घालीन”, फोन उचलताचं समोरील व्यक्तीनं या भाषेत त्यांना जीवे-मारण्याची धमकी दिली.

शिंदे गटाकडून हा फोन कॉल आला असल्याचं आनंद दुबे (Thackeray Group) यांनी म्हटलं आहे. शिंदे गटातील संजय माशेलकर यांनी हा फोन कॉल केला असल्याचा दावा दुबे यांनी केला आहे. तर या सर्व प्रकरणावर मुंबईच्या समतानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असल्याचंही दुबे यांनी सांगितलं आहे.

या सर्व प्रकरणावर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले, “राज्यामध्ये हे काय घडत आहे. शिवसेना प्रवक्ते आनंद दुबे काल एका टीव्ही चॅनलवर लाईव्ह असताना त्यांना धमकवण्यात आलं. हे सर्व घडूनही देवेंद्र फडणवीस शांत बसले आहे. तुम्ही काय विरोधकांना मारण्याची सुपारी घेतली आहे का? महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाचं सरकार आहे.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install