Share

CRPF Recruitment | सीआरपीएफ यांच्यामार्फत मेगा भरती! महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी आहेत ‘इतक्या’ जागा

CRPF Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: केंद्रीय राखीव पोलीस दल (Central Reserve Police Force) यांच्यामार्फत 9212 जागांसाठी मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू … Read more

Published On: 

CRPF Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: केंद्रीय राखीव पोलीस दल (Central Reserve Police Force) यांच्यामार्फत 9212 जागांसाठी मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकतात.

सीआरपीएफ यांच्यामार्फत (CRPF Recruitment) सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये तब्बल 9212 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या रिक्त जागांमध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी 754 जागा उपलब्ध आहे. यामध्ये पुरुषांसाठी 745 आणि महिलांसाठी 9 रिक्त जागा उपलब्ध आहे. यामध्ये कॉन्स्टेबल (ड्राइव्हर), कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक व्हेईकल), कॉन्स्टेबल (कॉब्लर), कॉन्स्टेबल (कारपेंटर), कॉन्स्टेबल (टेलर), कॉन्स्टेबल (ब्रास बँड), कॉन्स्टेबल (पाईप बँड), कॉन्स्टेबल (बगलर), कॉन्स्टेबल (गार्डनर), कॉन्स्टेबल (पेंटर), कॉन्स्टेबल (कुक), कॉन्स्टेबल (वॉटर कॅरियर), कॉन्स्टेबल (वॉशरमन), कॉन्स्टेबल (बार्बर), कॉन्स्टेबल (सफाई कर्मचारी), कॉन्स्टेबल (हेयर ड्रेसर) पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (CRPF Recruitment)शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

शासनाच्या या भरती प्रक्रियेमध्ये (CRPF Recruitment) उमेदवारांना दिनांक 2 मे 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या लिंकला भेट देऊ शकतात.

ऑनलाइन अर्ज करा (Apply online)

https://crpf.gov.in/recruitment-details.htm?263/AdvertiseDetail

जाहिरात पाहा (View ad)

https://crpf.gov.in/writereaddata/Portal/Recruitment_Advertise/ADVERTISE/1_263_2_144032023.pdf

अधिकृत वेबसाइट (Official website)

https://crpf.gov.in/

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही