Share

SSC Recruitment | स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत मेगाभरती! जाणून घ्या सविस्तर

SSC Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरी (Govt job) मिळवण्यासाठी धडपड करत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन (Staff Selection Commission) यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी मेगाभरती राबविण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. … Read more

Published On: 

SSC Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरी (Govt job) मिळवण्यासाठी धडपड करत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन (Staff Selection Commission) यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी मेगाभरती राबविण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC Recruitment) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यामध्ये असिस्टंट ऑडिट ऑफिसर, असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर, आयकर निरीक्षक, इस्पेक्टर, असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर, सब इंस्पेक्टर, एक्झिक्युटिव असिस्टंट, रिसर्च असिस्टंट, डिविजनल अकाउंटेंट, कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी, ऑडिटर, अकाउंटेंट, अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट, पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक, वरिष्ठ प्रशासकीय सहाय्यक, कर सहाय्यक, सब-इंस्पेक्टर पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (SSC Recruitment) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (SSC Recruitment) इच्छुक उमेदवारांना दिनांक 3 मे 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या लिंकला भेट देऊ शकतात.

ऑनलाइन अर्ज करा (Apply online)

https://ssc.nic.in/

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/149k9nuylZaor_7-TT5HPBOCePmYjvRoB/view

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://ssc.nic.in/

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही