Share

Faraj Malik । नवाब मलिक यांचा मुलगा फराज मलिक याच्यावर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Faraj Malik । मुंबई : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक ( NCP LEADER NAWAB MALIK ) गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तुरुंगात आहेत. अशातच आता नवाब मलिक यांचा मुलगा फराज मलीक (Faraj Malik) याच्याविरोधात गुन्हा दाखला झाला आहे. फराज मलिक यांची दुसरी बायको असल्याचा दावा करण्यात आला आहे. या महिलेचं नाव लॉरा हॅमलिन असल्याचे सांगण्यात … Read more

Published On: 

Faraj Malik । मुंबई : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक ( NCP LEADER NAWAB MALIK ) गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तुरुंगात आहेत. अशातच आता नवाब मलिक यांचा मुलगा फराज मलीक (Faraj Malik) याच्याविरोधात गुन्हा दाखला झाला आहे.

फराज मलिक यांची दुसरी बायको असल्याचा दावा करण्यात आला आहे. या महिलेचं नाव लॉरा हॅमलिन असल्याचे सांगण्यात येत आहे. आपल्या दुसऱ्या पत्नीच्या व्हिसासाठी बनावट कागदपत्रे वापरली असा आरोप फराज मलिक याच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी कुर्ला पोलिसांनी फराज मलिक याच्यासह अन्य १४ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची पोलीस अधिक कसून चौकशी करत आहेत.

फराज मलिक याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर भाजप नेते मोहित कंबोज यांनी एक ट्विट केले आहे. फराज मलिक याने फ्रेंच रहिवासी असलेल्या दुसरी पत्नी हॅमलीन हिच्या व्हिसा अर्जासाठी बनावट कागदपत्र दिली आहेत. दुसऱ्यांना फर्जीवाडा म्हणणारे स्वःताच किती फर्जी आहेत, असे ट्विट कंबोज यांनी केले आहे.

https://twitter.com/mohitbharatiya_/status/1615561877341491201?s=20&t=llmm92rudP71VhDAc5CtGA

दरम्यान, या कागदपत्रांची पडताळणी केली. त्यामध्ये असं निष्पण्ण झालं की, दोघांच लग्न हे खोटं आहे. मुंबई महापालिकेला यासंदर्भात चौकशी करण्याची सूचना दिली आहे. खोटं लग्नाचे दाखले देत व्हिसा मिळवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मलिकांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install