🕒 1 min read
मुंबई – थंडीचा कडाका कमी होतोय न होतोय तोच राज्याचं राजकारण पुन्हा एकदा तापणार आहे, याची चिन्हं दिसू लागली आहेत. गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका कधी लागणार? या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालं आहे. राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) आज अधिकृत घोषणा केली असून, राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये (ZP Election) निवडणुकीचा धुरळा उडणार आहे.
निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि सचिव सुरेश काकाणी यांनी आज पत्रकार परिषदेत हा Election Schedule जाहीर केला. त्यानुसार, राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी (Panchayat Samiti Election) ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. तर अवघ्या दोन दिवसांत, म्हणजे ७ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता निकाल हाती येतील आणि ‘गावाचा कारभारी’ कोण हे समजेल. आयोगाची घोषणा होताच संबंधित जिल्ह्यांत आदर्श आचारसंहिता (Code of Conduct) लागू झाली आहे.
Panchayat Samiti and ZP Election Maharashtra
कुठे होणार निवडणुका?
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, लातूर, परभणी, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, रायगड, रत्नागिरी / सिंधुदुर्ग या १२ जिल्ह्यांत राजकीय रणधुमाळी सुरू होणार आहे.
महत्वाच्या तारखा (Save the Dates):
अर्ज भरण्याची मुदत: १६ जानेवारी ते २१ जानेवारी
अर्जांची छाननी: २२ जानेवारी २०२६
अर्ज माघारी: २७ जानेवारी (दुपारी ३ पर्यंत)
मतदान: ५ फेब्रुवारी (सकाळी ७.३० ते सायं. ५.३०)
निकाल: ७ फेब्रुवारी
विशेष म्हणजे, ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात घेतल्या जातील, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिलेल्या मुदतवाढीनुसार आयोगाला १५ फेब्रुवारीपर्यंत प्रक्रिया पूर्ण करायची आहे.
निवडणूक आयोग ‘ॲक्शन मोड’वर
निवडणुकीत पैशांचा पाऊस पडू नये म्हणून आयोग सज्ज झाला आहे. आतापर्यंत भरारी पथकांनी ७ कोटींची रोकड आणि ५ कोटींचं मद्य जप्त केलं आहे. या निवडणुका ईव्हीएम (EVM) द्वारेच होणार असून १ जुलै २०२५ ची मतदार यादी यासाठी वापरली जाणार आहे. प्रचारासाठी ४८ तास आधी ‘शांतता काळ’ असेल, पण घरोघरी जाऊन प्रचाराला परवानगी असेल, मात्र माईक वापरता येणार नाही.
📌 महत्वाच्या बातम्या
- Post Office Scheme : पोस्टाच्या ‘या’ योजनेमध्ये पैसे होणार थेट दुप्पट! एकदा गुंतवा अन् टेंशन विसरा
- लाडक्या बहिणींचा हिरमोड? आयोगाचा सरकारला दणका; आता खात्यात येणार फक्त ‘इतके’ पैसे!
- ‘मशाल’ हाती घेत रवीना टंडन मैदानात; उद्धव ठाकरेंसाठी केली जोरदार बॅटिंग, Video पाहून मुंबईकर थक्क!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










