Weather Update । पुण्यासह राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पाऊस; हवामान विभागाने दिली महत्वाची माहिती

Weather Update | पुणे : अनेक दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाला (Rain) अखेर सुरुवात झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये (Farmer) देखील आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. राज्यातील बऱ्याच ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग देखील सुरु झाली आहे. दरम्यान, हवामान खात्याने (IMD) पुण्यासह इतर जिल्ह्यांना इशारा दिला आहे. आज हवामान खात्याकडून पुणे जिल्ह्यात … Read more

Published On: 

Weather Update | पुणे : अनेक दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाला (Rain) अखेर सुरुवात झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये (Farmer) देखील आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. राज्यातील बऱ्याच ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग देखील सुरु झाली आहे. दरम्यान, हवामान खात्याने (IMD) पुण्यासह इतर जिल्ह्यांना इशारा दिला आहे. आज हवामान खात्याकडून पुणे जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Heavy rain will fall in Pune today

आज पुण्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर राज्यातील रत्नागिरी (Ratnagiri), पालघर (Palghar), सिंधुदूर्ग (Sindhudurg) या जिल्ह्यांमध्ये देखील मुसळधार पाऊस पडणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना देखील हवामान विभागाने ( Weather Update ) यलो अलर्ट जारी केला आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये देखील मुसळधार पाऊस होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना पावसाचा अंदाज घेऊन घराबाहेर पडावे असे आव्हान करण्यात आले आहे. दरम्यान, राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली असली तरी काही ठिकाणी पावसाने पाठ फिरवली आहे.

महत्वाच्या बातम्या :

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही