Eknath Shinde | आदित्य ठाकरेंच्या मोर्चाला ‘चोर मचाये शोर’ म्हणतं भाजप-शिंदे गटाचं प्रत्युत्तर

Eknath Shinde | मुंबई: 01 जुलै 2023 रोजी ठाकरे गटाकडून मुंबई महानगरपालिकेवर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा होणार आहे. मुंबई शहरातील विकास कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर हा मोर्चा काढण्यात येणार आहे. ठाकरे गटाच्या या मोर्चाला सत्ताधारी पक्ष सडेतोड उत्तर देणार आहे.

आदित्य ठाकरे यांच्या या धडक मोर्चाला शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकार सडेतोड उत्तर देणार असल्याचं बोललं जात आहे. शिंदे-फडणवीस सरकारकडून देखील मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यांच्या मोर्चात ते ‘चोर मचाये शोर’ असे नारे देणार आहे. या मोर्चामुळे मुंबईतील राजकीय वातावरण चांगलंच तापणार आहे.

आदित्य ठाकरे यांच्या विराट मोर्चाला भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि आरपीआय महायुतीकडून प्रत्युत्तर (Eknath Shinde) दिलं जाणार आहे. 1 जुलै २०२३ रोजी दुपारी 4 वाजता हा मोर्चा काढला जाईल. नरिमन पॉईंट येथे हा मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चामुळे राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Uddhav Thackeray made serious allegations against the state government

दरम्यान, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्य सरकारवर (Eknath Shinde)  गंभीर आरोप केले आहे. मुंबईमध्ये विकास कामाच्या नावानं फक्त उधळपट्टी सुरू आहे. त्याचबरोबर पावसाप्रमाणे निवडणूक दिवसेंदिवस लांबत चालल्या आहे, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला होता. त्याच पार्श्वभूमीवर 1 जुलैला ठाकरे गटाकडून विराट मोर्चा काढण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.