दरेकर गरब्यावर करोडो उधळतायेत, तर गोरट्याल नाचतोय; दसरा मेळाव्यात सुषमा अंधारेंचा सरकारवर घणाघात

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत सडकून टीका केली.

Published On: 

MHD LOGO

प्रतिनिधी, 22 ऑक्टोबर: शिवसेना ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. एकीकडे आम्हाला काटकसर करायला सांगायचे आणि दुसरीकडे प्रवीण दरेकर गरब्यावर करोडो रुपये खर्च करत आहेत, असा घणाघात त्यांनी केला. गोरट्याल पैसे उधळत नाचत असल्याचा थेट उल्लेख करत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या उधळपट्टीवर निशाणा साधला.

मिंधे गटाचे दलाल आता चारा छावण्यांमध्येही दलाली सुरू करतील, त्यामुळे आम्हाला चारा द्या, असा टोला अंधारे यांनी लगावला. सर्वसामान्यांची जगण्या-मरण्याची झुंज सुरू असताना शिंदे आणि फडणवीस केवळ खुर्चीसाठी लढत असल्याचे त्या म्हणाल्या. पुण्यात शिक्षक निवडणुकीत कार्यकर्त्याचा अर्ज मागे घेतल्याचा संदर्भ देत, एकनाथ शिंदे काय मुख्यमंत्री होणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

पोलिस भरतीवर गंभीर आरोप करताना, १८ लाख रुपये घेऊन ६०० पीएसआय भरल्याचा दावा सुषमा अंधारे यांनी केला. आम्ही प्रश्न विचारले की आम्हाला ‘अर्बन नक्षल’ ठरवले जाते, असे म्हणत त्यांनी फडणवीसांना लक्ष्य केले. गोपीनाथ मुंडे आणि मनोहर जोशी यांनी एकेकाळी अंडरवर्ल्ड संपवले होते आणि आमच्या पक्षानेही दहशत मोडून काढली. मात्र, आताची भाजप ती राहिली नसून केवळ सत्तेसाठी अंडरवर्ल्डचा वापर केला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

बाबा सिद्दीकी यांना याच दिवशी गोळ्या घालण्यात आल्या होत्या, त्यांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण झाले तरी फडणवीस यांनी वर्षभरात काय केले, असा प्रश्न अंधारे यांनी विचारला. तसेच, मीनाक्षी शिंदे यांच्या प्रकरणाचा उल्लेख करत, तुमचेच पोलिस त्यांना सुरक्षा देत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

बिष्णोई गँग देवेंद्र फडणवीसांना वाकोल्या दाखवत असल्याची बोचरी टीकाही त्यांनी केली. ‘तुम्ही आमच्या नोटा मोजत असाल, तर तुम्हाला आमची मते मोजावी लागतील,’ असा सूचक इशारा देत सुषमा अंधारे यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

सुषमा अंधारे यांच्या आरोपानुसार, एकीकडे लोकांना काटकसर करायला सांगत असताना दुसरीकडे प्रवीण दरेकर गरब्यावर करोडो रुपये खर्च करत आहेत आणि गोरट्याल पैसे उधळत नाचत आहेत.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही