दक्षिण आफ्रिकेचा मोठा जुगार; दोन ‘फायरब्रँड’ फलंदाजांचा पत्ता कट, संघात कुणाला लॉटरी?

South Africa announces T20 World Cup squad; Tristan Stubbs and Ryan Rickelton dropped while Jason Smith gets a surprise call-up.

Published On: 

South Africa announces T20 World Cup squad; Tristan Stubbs and Ryan Rickelton dropped while Jason Smith gets a surprise call-up.

पुणे – २०२४ च्या टी-२० वर्ल्डकप फायनलमधील तो निसटता पराभव आजही दक्षिण आफ्रिकेच्या ( South Africa ) चाहत्यांच्या जिव्हारी लागला असेल. ‘चोकर्स’चा शिक्का पुसून काढण्यासाठी आता हा संघ पुन्हा एकदा सज्ज झालाय. भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या आगामी टी-२० वर्ल्डकपसाठी दक्षिण आफ्रिकेने आपला १५ शिलेदारांचा चमू जाहीर केला आहे. मात्र, ही यादी समोर येताच क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. कारण, निवड समितीने दोन बड्या मॅचविनर्सला चक्क डच्चू दिलाय.

कोणाचा पत्ता कट, कोणाला संधी?

संघाची धुरा पुन्हा एकदा एडन मार्क्रमकडेच सोपवण्यात आली आहे. पण धक्कादायक बाब म्हणजे, अत्यंत आक्रमक समजले जाणारे रेयान रिकल्टन आणि ट्रिस्टन स्टब्स या दोघांनाही संघात स्थान मिळालेले नाही. त्यांच्या जागी संघ व्यवस्थापनाने नवोदितांवर मोठा डाव लावलाय. डेवाल्ड ब्रेविस (ज्याला क्रिकेटविश्व ‘बेबी एबी’ म्हणून ओळखते), क्वेना मफाका, कॉर्बिन बॉश आणि जॉर्ज लिंडे हे खेळाडू पहिल्यांदाच वर्ल्डकपच्या रणांगणात आपले नशीब आजमावतील.

१९ चेंडूत ६८ धावा अन् थेट तिकीट!

या संघनिवडीत सर्वात जास्त चर्चा आहे ती जेसन स्मिथची. या पठ्ठ्याकडे फक्त ५ आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव आहे. मग निवड का झाली? तर कारण आहे त्याची नुकतीच झालेली एक वादळी खेळी. सीएसए टी-२० चॅलेंजच्या प्ले-ऑफमध्ये जेसनने अवघ्या १९ चेंडूत ६८ धावा कुटल्या होत्या. त्याच्या याच ‘विस्फोटक’ फॉर्मची दखल घेत त्याला थेट वर्ल्डकपचे तिकीट देण्यात आले आहे.

दुसरीकडे, भारताच्या दौऱ्यावर दुखापतीमुळे मुकलेला हुकमी एक्का कगिसो रबाडा याचे संघात पुनरागमन झाले आहे. दक्षिण आफ्रिका ( South Africa ) ‘ड’ गटात असून त्यांचा पहिला सामना ९ फेब्रुवारीला कॅनडाविरुद्ध रंगणार आहे.

South Africa T20 WC Squad

दक्षिण आफ्रिकेचा संघ  : एडन मारक्रम (कर्णधार), कॉर्बिन बॉश, डेवाल्ड ब्रेविस, क्विंटन डिकॉक, टोनी डी जोरजी, डोनोवन फरेरा, मार्को यानसेन, जॉर्ज लिंडे, केशव महाराज, क्वेना मफाका, डेविड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्टजे, कगिसो रबाडा, जेसन स्मिथ

ऑस्ट्रेलियाचा संघही जाहीर एकीकडे आफ्रिकेने धक्कातंत्र वापरले असताना, दुसरीकडे कांगारूंनीही (ऑस्ट्रेलिया) आपला संघ जाहीर केला आहे. मिचेल मार्शच्या नेतृत्वाखाली ऑसी संघ मैदानात उतरणार असून पॅट कमिन्स, ट्रॅव्हिस हेड आणि मॅक्सवेलसारखे दिग्गज संघात कायम आहेत.

ऑस्ट्रेलियाचा संघ  : मिचेल मार्श (कर्णधार), झेवियर बार्टलेट, कूपर कॉनोली, पॅट कमिन्स, टिम डेव्हिड, कॅमेरॉन ग्रीन, नाथन एलिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मॅथ्यू कुहनेमन, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू शॉर्ट, मार्कस स्टोइनिस आणि ॲडम झाम्पा.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही