प्रतिनिधी, 5 ऑक्टोबर: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) चे नेते सचिन खरात (Sachin Kharat) यांनी अभिजीत दिपके यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दिपके यांच्यासारख्या फुटीरवादी नेत्यांमुळेच आंबेडकरी चळवळीचे मोठे नुकसान होत असून, ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पक्षाला पुढे नेण्याऐवजी इतर राजकीय पक्षांसाठी काम करत असल्याचा दावा खरात यांनी केला आहे.
पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांची तीन वेगवेगळी आंदोलने सुरू असताना दिपके यांनी केवळ एकाच आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा दिला. त्यांच्या या भूमिकेमुळे एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात फूट पडल्याचा थेट आरोप खरात यांनी केला आहे. तसेच, दिपके हे ‘डुप्लिकेट’ आणि ‘गद्दार’ विद्यार्थी नेते असून एमपीएससी विद्यार्थ्यांनी त्यांच्यापासून सावध राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
जंतर-मंतरवर विद्यार्थी न्याय आंदोलनाचे नेतृत्व करत स्वतःला विद्यार्थी नेता म्हणवणाऱ्या दिपके यांनी आता राजकारण सुरू केले आहे. मुंबईत निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची त्यांनी केलेली मागणी याच राजकारणाचा भाग असल्याचे खरात म्हणाले. वंचितांना न्याय देण्याचे आणि आंबेडकरी विचार पुढे नेण्याचे काम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) करत असल्याचे त्यांनी शेवटी स्पष्ट केले.
📌 महत्वाच्या बातम्या
- सुधारित ‘फॉर्म ६’ ला आमची मंजुरी नाही; सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाचा दावा फेटाळला
- आदित्य ठाकरेंचा पासपोर्ट जप्त करून लुकआऊट नोटीस काढा; नितेश राणेंचा मोठा आरोप
- वयाच्या १५ व्या वर्षी विक्रम रचणाऱ्या वैभवला संघातून का वगळलं जातं? गौतम गंभीरने दिले स्पष्टीकरण
Quick Answers
पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांची तीन आंदोलने सुरू असताना दिपके यांनी केवळ एकाच आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा दिला, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या आंदोलनात फूट पडली, असा आरोप सचिन खरात यांनी केला आहे. तसेच दिपके हे इतर राजकीय पक्षांसाठी काम करत असल्याचा दावाही त्यांनी केला.
अभिजीत दिपके हे ‘डुप्लिकेट’ आणि ‘गद्दार’ विद्यार्थी नेते असून एमपीएससी विद्यार्थ्यांनी त्यांच्यापासून सावध राहावे, असे आवाहन सचिन खरात यांनी केले आहे.
मुंबईत निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची दिपके यांनी केलेली मागणी हा त्यांच्या राजकारणाचाच एक भाग असल्याचे खरात यांनी म्हटले आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









