IPL 2024 : हार्दिकच्या कॅप्टन्सीला वैतागून रोहित शर्मा घेणार मोठा निर्णय?

Rohit Sharma And Jasprit Bumrah Leave Mumbai Indians

Rohit Sharma । IPL 2024 ला रोहित शर्मा डावलून हार्दिक पंड्या याला कर्णधार करण्यात आले होते. पंड्याला कर्णधार केल्याने मुंबई इंडियन्सचे फॅन्स तसेच खेळाडू हि नाराज झाल्याचे चित्र आहे.

हार्दिक पंड्या याच्या नेतृ्त्वात मुंबई इंडियन्सला सुरवातीच्या 3 सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. पराभव झाल्याने हार्दिकवरचा रोष आणखी वाढला आहे.

दरम्यान, रोहित शर्मा बद्दल मोठी माहिती समोर आली आहे. रोहित 17 व्या हंगामानंतर मुंबई इंडियन्सची साथ सोडणार आहे. रोहित सोबत जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव हे देखील मुंबई इंडियन्सची साथ सोडणार असल्याचे बोलले जात आहे.

मुंबईने हार्दिकच्या नेतृ्त्वात अहमदाबाद, हैदराबाद आणि मुंबईत असे 3 सामने खेळले आहेत. या तिन्ही सामन्यात रोहितच्या चाहत्यांनी हार्दिकला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले आहे.

आयपीएल 2025 स्पर्धेत रोहित चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणार असल्याचेही बोलले जात आहे. यावर माजी खेळाडू अंबाती रायडू म्हणाला की, ”एमएस धोनी निवृत्त झाला तर चेन्नई सुपर किंग्सचं नेतृत्व रोहितने करावे. मी रोहित शर्माला सीएसकेचा कर्णधार होण्याची वाट पाहात आहे.”

रोहितच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सला 5 वेळा आयपीएलची ट्रॉफी मिळाली असून हार्दिकच्या नेतृत्वात मुंबईला यावर्षी विजयाचं खातंही उघडता आलेलं नाही. रोहितला पुन्हा कॅप्टन्सी मिळणार?

माहितीनुसार, रोहितला पुन्हा कर्णधार करण्याबाबत चर्चा सुरु आहे. मात्र याआधी कॅप्टन हार्दिकला कामगिरी सुधारण्यासाठी 2 सामन्यांचा वेळ दिला जाऊ शकतो. मात्र या सर्व चर्चा आहेत. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Rohit Sharma And Jasprit Bumrah Leave Mumbai Indians

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.