शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर; मराठा चेहरा डॉ. ज्योती मेटे यांना डावलले

Sharad Pawar Camp Lok Sabha Candidate List

Sharad Pawar । लोकभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाकडून लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. यादीत बीडमधून बजरंग सोनावणे ( Bajrang Sonawane) तर भिवंडीतून सुरेश म्हात्रे यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.

बीड लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी ज्योती मेटे आणि बजरंग सोनावणे हे दोघेजण इच्छूक होते. गेल्या निवडणुकीत प्रीतम मुंडे ( भाजप – 6,78, 175 मत )  यांनी बजरंग सोनावणे यांचा तब्बल 1 लाख 78 हजार 920 मतांनी पराभव केला होता.

बजरंग सोनवणे यांना 5,09,807 मतदान झाले  यात धनंजय मुंडे यांचा मोठा वाटा होता. त्यामुळे यावेळी सोनावणे यांना हि निवडणूक जड जाणार आहे. कारण धनंजय मुंडे हे आता महायुतीत म्हणजेच पंकजा मुंडे यांचा प्रचार करणार आहेत.

बजरंग सोनवणे यांची आर्थिक क्षमता चांगली आहे त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळावी म्हणून बीड मधील एक गट आग्रही होता. पण निवडणूका फक्त पैशाच्या जीवावर जिंकल्या जाऊ शकत नाही याचा दांडगा अनुभव शरद पवारांना असताना पवारांनी हि खेळी केली आहे.

मुंडे यांना डॉ. ज्योती मेटे याच कडवे आव्हान देऊ शकतात, असा सूर पक्षात असताना बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. डॉ. ज्योती मेटे ( Jyoti Mete ) यांचे दिवंगत पती विनायक मेटे यांनी मराठा समाजासाठी गेली अनेक वर्ष वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करत समाजाचे प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न केलेले आहेत. मराठा चळवळीत त्यांनी दिलेले योगदान समाजाला विसरता येणार नाही. ज्योती मेटे या स्वतः उच्चपदस्थ अधिकारी राहिलेल्या आहेत.

मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभे करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला एकत्र आणले आहे. याचा देखील फायदा मेटे यांना होणार आहे.

मुंडे परिवारावर मराठा समाज नाराज

प्रीतम मुंडे यांचे मराठा समाजावरील वक्तवाने मराठा समाज मुंडे परिवारावर नाराज आहे. राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असतांना विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांनी 127 व्या घटनादुरुस्ती विधेयकावर लोकसभेत बोलताना म्हणाल्या की, प्रत्येकजण केवळ मराठा आरक्षणाबाबत बोलत आहे, मात्र ओबीसी आरक्षणाबाबत कोणी बोलत नाही, असं म्हंटल्याने मराठा समाज दुखावला गेला. मुंडे फक्त ओबीसी आरक्षणाबाबत भूमिका घेतात मराठा आरक्षणावर बोलत नाही असा संदेश मराठा समाजामध्ये गेला होता.

एका व्हायरल व्हिडिओ मध्ये प्रीतम मुंडे म्हणतात की, समोर ३ गरजू असतील तर आपल्या जातीचा पाहून त्याला मदत करा. विद्यमान खासदार बीड मध्ये जातीचे राजकारण करतात आणि मराठा समाजाला डावलतात अशी चर्चा या व्हायरल व्हिडिओ नंतर सुरु झाली.

मराठा समाजाचा रोष कमी करण्यासाठी मराठा भवन बांधून देण्याचे धनंजय मुंडे यांचे आश्वासन

मराठा आरक्षणाच्या मागणीतून निर्माण झालेल्या रोषामुळे पंकजा मुंडे यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न झाला. त्यांना काळे झेंडेही दाखवले गेले. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी परळीत स्थानिक मराठा नेत्यांची बैठक घेतली व त्यात ‘मराठा भवन’ बांधून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

धनंजय मुंडे यांनी बोलावलेल्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीस फारशी गर्दी नव्हती. मुंडे यांनी बोलावलेल्या बैठकीकडे प्रमुख स्थानिक नेत्यांनी पाठ फिरवल्याचे सांगण्यात येते.

Sharad Pawar Camp Lok Sabha Candidate List

शरद पवार गटाचे उमेदवार

वर्धा – अमर काळे

दिंडोरी – भास्करराव भगरे

बारामती -सुप्रिया सुळे

शिरुर- डॉ. अमोल कोल्हे

अहमदनगर – निलेश लंके

बीड – बजरंग सोनवणे

भिवंडी – सुरेश म्हात्रे

पंकजा मुंडेंचा करेक्ट कार्यक्रम देवेंद्र फडणवीसांनी केला

पंकजा मुंडेंचा करेक्ट कार्यक्रम देवेंद्र फडणवीसांनी केला असल्याचीही चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु आहे. राज्यात पुन्हा भाजपची सत्ता आली तर मुंडे या मुख्यमंत्री पदावर दावा करू शकतात. त्यांना यावेळी डावलणे भाजपला जड गेले असते. दुसरीकडे उद्धव ठाकरे गट पंकजा यांना मदत करणार असल्याचे ठाकरे यांनी यापूर्वीच जाहीर केले होते. त्यामुळे फडणवीसांची गोची होणार होती, यातून मार्ग काढत देवेंद्र फडणवीसांनी पंकजा मुंडे लोकसभेची उमेदवारी देत ‘करेक्ट कार्यक्रम’ केला असल्याची चर्चा आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.