अजित पवारांच्या चिंतेत वाढ; बारामतीच्या सर्वेक्षणात सुप्रिया सुळे नऊ वेळा आघाडीवर

Rohit Pawar, Ajit Pawar, Supriya Sule, Sunetra Pawar अजित पवारांकडून बारामतीत नऊ वेळा सर्वेक्षण

Rohit Pawar vs Ajit Pawar पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी अजित पवार यांच्याकडून जे कोणी उमेदवार असतील, त्याबाबत अजित पवार यांच्याकडून नऊ वेळा सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यामध्ये अजित पवार यांचा उमेदवार पिछाडीवर आहे, तर सुप्रिया सुळे याच त्या सर्वेक्षणात आघाडीवर आहेत, असा दावा आमदार रोहित पवार यांनी पुण्यात केला. तसेच आता पुन्हा एकदा दहाव्यांदा अजित पवार हे बारामती मतदारसंघाचे सर्वेक्षण करतील, असेही रोहित पवार म्हणाले.

राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून विद्यामान खासदार सुप्रिया सुळे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. महायुतीकडून सुनेत्रा अजित पवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

रोहित पवार म्हणाले की, अजित पवार यांच्याकडून नऊ वेळा सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये सुप्रिया सुळे याच आघाडीवर असल्याचे दिसून आले. बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे या किमान अडीच लाख मताधिक्यानी निवडून येतील.

गेल्या काही महिन्यांत भाजपने देशात आणि राज्यात पक्ष, कुटुंब फोडाफोडीची जी कार्यपद्धती अवलंबली आहे त्यावर मतदार आणि भाजपची अनेक नेतेमंडळी नाराज आहे. एकूणच परिस्थिती बघता, भाजपला त्यांचाच मतदार मतदान करणार नसल्याचे दिसून येत आहे.

आमदार नीलेश लंके हे अजित पवार यांच्याकडे होते. त्यावेळी सातत्याने त्यांना मतदारसंघातील नागरिक भेटून सांगत होते, की जर तुम्ही शरद पवार यांच्यासोबत राहिलात, तर आम्ही तुम्हाला मतदान करू. त्यानंतर त्यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा बोलून दाखवली आणि आता लंके हे आमच्यासोबत आले असून त्यांचे मताधिक्य चांगले असेल. बलाढ्य शक्तीविरोधात सामान्यांची शक्ती अशी लढत होणार आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.