Share

नाना पाटेकर यांचं गोव्यात अकाली निधन; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे अन् सुनेत्रा पवारांनी उलगडल्या आठवणी

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने मनोरंजन आणि राजकीय विश्वात शोककळा; मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्र्यांनी जागवल्या आठवणी.

Published On: 

Nana Patekar Passes Away

प्रतिनिधी, 8 ऑक्टोबर : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर आपल्या आवाजाचा आणि अभिनयाचा दबदबा निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांचं गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी घेतलेली ही अचानक ‘एक्झिट’ संपूर्ण मनोरंजन विश्वासाठी आणि महाराष्ट्रासाठी मोठा धक्का मानली जात आहे.

पडद्यावरचा ‘क्रांतिवीर’ आणि वास्तवातला ‘नटसम्राट’ हरपल्याची भावना सध्या सर्वसामान्यांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत व्यक्त केली जात आहे. त्यांच्या या निधनाचे वृत्त वाऱ्यासारखे पसरताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अतिशय भावूक शब्दांत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.

Nana Patekar Passes Away

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नानांच्या अकाली जाण्यावर तीव्र दुःख व्यक्त केलं. “नाना जितके पडद्यावर मोठे होते, तितकेच ते मनानेही मोठे होते,” असं फडणवीस म्हणाले. जलयुक्त शिवार अभियानात नानांनी स्वतःहून दिलेला पाठिंबा आणि मकरंद अनासपुरेंसोबत ‘नाम फाऊंडेशन’च्या माध्यमातून दुष्काळग्रस्तांसाठी केलेलं काम कधीही विसरता येणार नाही, अशी आठवण त्यांनी सांगितली.

दुसरीकडे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. “अभिनयाचा एक युगपुरुष हरपला असून, नानांचे दादांशी अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच, ‘नटसम्राट’ आणि ‘परिंदा’सारख्या कलाकृती आणि त्यांनी वंचितांसाठी दिलेलं योगदान नेहमीच प्रेरणादायी राहील, असं त्या म्हणाल्या.

महाराष्ट्राचा स्वाभिमान हरपल्याची अत्यंत सून्न करणारी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. अगदी अलीकडेच गणेशोत्सवात त्यांची भेट झाली होती, तेव्हा नाना दरेगावी गाळ उपसण्याच्या कामासाठी आले होते. त्यावेळी शिंदे यांच्याकडे बघत “एकही डाग नसलेला नेता!” अशी कौतुकाची थाप नानांनी दिल्याची आठवण त्यांनी उलगडली.

विशेषतः २०२२ च्या राजकीय घडामोडींनंतर नानांनी शिंदेंना “काय क्रांतिवीर…” अशी साद घातली होती. कुठलाही गॉडफादर नसताना बॉलीवूडमध्ये मराठी माणसाचा बाणा त्यांनी जपला, असं शिंदे म्हणाले. दरम्यान, काश्मीरमधील मुलांसाठी शाळा सुरू करण्याचं नानांचं अखेरचं स्वप्न होतं, आणि ते पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची मोठी घोषणाही एकनाथ शिंदे यांनी या निमित्ताने केली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

नाना पाटेकर यांचे गोव्यात वयाच्या ७५ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही