Share

रोहित शर्माला कर्णधार पदावरून काढल्यानंतर पुन्हा मुंबई इंडियन्सचा मोठा निर्णय

Mumbai Indians Jersey

Published On: 

Mumbai Indians Jersey : IPL 2024 चा 17 वा हंगाम काही दिवसातच सुरु होणार आहे. त्याआधी मुंबई इंडियन्सने मोठा निर्णय घेतला होता. आयपीएल 2024 मध्ये आपल्याला अनेक संघात बदल झालेले दिसणार आहे. सर्वात मोठा बदल गुजरात टायटन्स ( Gujarat Titans )  आणि मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians ) मध्ये झालेला दिसून येणार आहे.

मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधार पदावरून काढल्यानंतर हार्दिक पंड्याला आपल्या संघात सामील करुन कर्णधार पद दिले होते. हार्दिकला कर्णधार केल्याने मुंबई इंडियन्सने फॅन्स नाराज झाले होते. फॅन्सने मुंबई इंडियन्सची ( Mumbai Indians ) जर्सी जाळत निषेध नोंदवला होता. काही दिवसांपूर्वी हार्दिक पंड्या गुजरातची टीम सोडून पुन्हा मुंबई इंडियन्सकडे परत आला आहे.

मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला संघात घेण्यासाठी गुजरात टायटन्सला १०० कोटी रुपये दिल्याचा दावा इंडियन एक्स्प्रेसने केला होता. आयपीएल 2024 लिलावाच्या आधी मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला 15 कोटी रुपयांमध्ये गुजरात टायटन्स कडून ट्रेंड केले होते.

Mumbai Indians New Jersey

आयपीएल 2024 कर्णधार बदल्यानंतर आता मुंबई इंडियन्सने जर्सीही बदलली आहे. मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर पोस्ट करत आपली जर्सी लाँच केली. ही जर्सी प्रसिद्ध डिझायनर मोनिषा जयसिंह यांनी डिझाईन केली आहे. मुंबई इंडियन्सच्या जुन्या जर्सीप्रमाणेच नव्या जर्सीचा रंग निळा आहे. तर निळ्या रंगाच्या जर्सीवर खांद्याच्या बाजूला सोनेरी पट्टे आहेत. नवीन जर्सीवर एम हे अक्षर संपूर्ण जर्सीमध्ये तुम्हाला दिसून येत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही